Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभास की शाहरुख खान कोण आहे महागडा स्टार?, जाणून घ्या 'सालार' आणि 'डंकी'साठी कोणी किती घेतलं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 10:16 IST

डंकी'सोबतच साऊथचा सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान सध्या त्याचा आगामी 'डंकी' सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. 'डंकी'ची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. 'डंकी'सोबतच साऊथचा सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. केवळ २४ तासांच्या अंतराने भारतीय सिनेसृष्टीतील शाहरुख खान आणि प्रभास हे दोन बडे स्टार्स आमनेसामने उभे ठाकणार आहेत

सोशल मीडियावर या चित्रपटांची क्रेझ लक्षात येते. रिलीज होण्याआधीच शाहरुख खानचा वर्षातील तिसरा मोस्ट अवेटेड चित्रपट 'डंकी' आणि प्रभासचा 'सालार' यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये दोनही सिनेमाने चांगला प्रतिसाद मिळतो  आहे. 

'सालार'चे दिग्दर्शन 'केजीएफ' फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांनी केले आहे तर 'डंकी'चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे.  वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर शाहरुख खान विरुद्ध प्रभास असा सामना होणार आहे. पण शाहरुख खान आणि प्रभासमध्ये सर्वात महागडा अभिनेता कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या शाहरुख खानने 'डंकी'साठी किती फी घेतली आहे की प्रभासने 'सालार'साठी किती मानधन घेतलं ते. 

'डंकी'मध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये त्याने 'हार्डी'ची भूमिका साकारली आहे. यापूर्वी 'पठाण' आणि 'जवान' हिट झाल्यानंतर त्याने आपल्या फी वाढव केल्याची बातमी आली होती आणि त्यासाठी त्याने 100 कोटी रुपये घेतले आहेत पण रिपोर्ट्सनुसार अभिनेत्याने 29 कोटी रुपये घेतले आहेत.

प्रभासने 'सलार'साठी जवळपास 100 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. एवढेच नाही तर चित्रपटाच्या प्रॉफिट शेअरिंगमध्येही त्याचा वाटा असेल. 

टॅग्स :शाहरुख खानप्रभास