अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याचा चित्रपट 'धुरंधर' (Dhurandhar) ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अक्षय खन्नाने या चित्रपटात रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. हा पाकिस्तानी गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या नेमका कोण आहे? चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर याबद्दल शोध घेत आहेत. चला जाणून घेऊया पाकिस्तानचा नंबर १ डॉन रहमान डकैतची कहाणी.
रहमान डकैत आणि उझैर बलूच ही पाकिस्तानी अंडरवर्ल्डमधील कुप्रसिद्ध नावे आहेत, ज्यांची कथा 'धुरंधर' चित्रपटाद्वारे आदित्य धरने रुपेरी पडद्यावर कोणत्याही संकोचाशिवाय आणण्याचा प्रयत्न केला आहे. अक्षय खन्ना या चित्रपटात क्रूर रहमान डकैतच्या भूमिकेत दिसला, तर दानिश पंडोरने उझैर बलूचचे पात्र साकारले आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी, दानिश 'कितनी मोहब्बत है'मध्ये मिखाईल सिंघानिया आणि 'एजेंट राघव'मध्ये एजेंट राजबीरच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय त्याने 'छावा', 'सेक्रेड गेम्स', '३६ डेज', '१९२०: हॉरर्स ऑफ द हार्ट' आणि इतर चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
कोण आहे उझैर बलूच?११ जानेवारी १९७० रोजी कराचीच्या लियारीमध्ये जन्मलेला उझैर बलूच हा ट्रान्सपोर्टर फैज मुहम्मदचा मुलगा आहे. उझैरने अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पण, २००३ मध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर, लियारी येथील ड्रग्ज माफिया हाजी लालूचा मुलगा अरशद पप्पूने त्याच्या वडिलांची निर्घृण हत्या केली, ज्यामुळे त्याचे आयुष्य बदलले. यानंतर, वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तो त्याचा चुलत भाऊ रहमान डकैतच्या टोळीत सामील झाला.
कोण होता अब्दुल रहमान बलूच?सरदार अब्दुल रहमान बलूच उर्फ रहमान डकैत हा कराचीच्या लियारी भागात राहणारा एक पाकिस्तानी गँगस्टर होता, ज्याने 'पीपल्स अमन कमिटी'ची स्थापना केली होती. तो कराचीचा एक डेंजरस अंडरवर्ल्ड डॉन होता. डकैत हा सरदार उझैर जान बलूचचा चुलत भाऊ होता, जो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar' features Akshay Khanna as Rahman Dakait, a notorious Pakistani gangster. The film explores Dakait and Uzair Baloch's criminal world, prompting online searches about Dakait's true identity and background. Uzair Baloch sought revenge after his father's murder and joined Dakait's gang.
Web Summary : रणवीर सिंह की 'धुरंधर' में अक्षय खन्ना रहमान डकैत के रूप में हैं, जो एक कुख्यात पाकिस्तानी गैंगस्टर है। फिल्म डकैत और उज़ैर बलूच की आपराधिक दुनिया को दर्शाती है, जिससे डकैत की असली पहचान और पृष्ठभूमि के बारे में ऑनलाइन खोजें बढ़ गई हैं। उज़ैर बलूच ने अपने पिता की हत्या के बाद बदला लेने के लिए डकैत के गिरोह में शामिल हो गया।