Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोणी कोणी दिला फवादच्या रोलसाठी नकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 21:50 IST

नामवंत कलाकाराने एखाद्या चित्रपटातील रोल नाकारावा आणि तो नवख्या हीरोला मिळून तो हीट व्हावा याची अनेक उदाहरणे बॉलिवूडमध्ये आहेत. ...

नामवंत कलाकाराने एखाद्या चित्रपटातील रोल नाकारावा आणि तो नवख्या हीरोला मिळून तो हीट व्हावा याची अनेक उदाहरणे बॉलिवूडमध्ये आहेत. अनेक हीरोंनी ‘जंजीर’ नाकारला आणि नाईलाजाने प्रकाश मेहरांना अमिताभला घ्यावे लागले. पुढे काय झाले तो इतिहास आहे.शाहरुख खानला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवणारा ‘बाजीगर’ सलमानने तर ‘डर’ आमिरने नाकारला होता. तसेच काहीसे फवाद खानच्या बाबतीत घडताना दिसत आहे.या वर्षीचा सरप्राईज हीट चित्रपट ‘कपूर अँड सन्स’मधील फवादच्या अभिनयाची सध्या सर्वत्र कौतुक सुरू आहे. अनेक निर्माते आता त्याला चित्रपटात घेऊ पाहत आहेत.पण तुम्हाला माहित आहे का, सिद्धाथ मल्होत्राच्या मोठ्या भावाच्या रोलसाठी फवादला पहिली पसंती नव्हती.फवादच्या आधी फरहान अख्तर, आदित्य रॉय कपूर आणि शाहिद कपूर यांना तो रोल आॅफर केला गेला होता. त्या सर्वांनी नकार दिल्यामुळे अखेर फवादची निवड करण्यात आली. याता याला नशीब म्हणायचे की आणखी काही?