Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कोण कोण पिणार यंदा करणसोबत कॉफी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 13:14 IST

केवळ प्रेक्षकच नाही तर सेलिब्रेटिंनाही ‘कॉफी विथ करण’ या शोची उत्सुकता असते. यंदाच्या सीझनमध्ये  करण समोर बसून कोण कॉफी ...

केवळ प्रेक्षकच नाही तर सेलिब्रेटिंनाही ‘कॉफी विथ करण’ या शोची उत्सुकता असते. यंदाच्या सीझनमध्ये  करण समोर बसून कोण कॉफी हॅम्पर जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘सीझन ५’ची गेस्ट लिस्ट काय असणार याबाबत ट्विटरवर करणने टीझ केले आहे. यंदा पहिल्या एपिसोडमध्ये फवाद खानची वर्णी लागल्याची जोरदार चर्चा आहे. ‘कपूर अँड सन्स’नंतर तो करण दिग्दर्शित चित्रपटातही तो दिसणार आहे. त्यामुळे त्याचे नाव सर्वात वर असल्याचे सांगितले जातेय. या सेलिब्रेटी टॉक शोमध्ये कित्येक स्टार्सने तिखट टिप्पण्या करून बरेच वाद निर्माण केले आहेत. सोनम कपूर, इम्रान हाश्मी, आलिया भट यांना तर याचा चांगलाच अनुभव आहे. म्हणून करण यावेळी कोणती कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण करणार याची चाहते वाट पाहत आहे. मागच्या सीझनमध्ये आमिर आणि सलमान यांनी प्रथमच हजेरी लावली होती. यावेळी कोणते सरप्राईज असणार थोड्या दिवसांत कळेलच.