Join us
Daily Top 2Weekly Top 5

दाक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये हा अभिनेता ठरला अव्वल, तुम्हाला कोण वाटतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 07:15 IST

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रियता चार्टमध्ये रजनीकांत, महेश बाबू, पृथ्वीराज सुकुमारन, प्रभास या कलाकारांचा टॉप पाचमध्ये समावेश आहे.

रजनीकांतची लोकप्रियता त्यांच्या चाहत्यांमध्ये एवढी आहे की, त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने ‘थलायवा’ असे म्हणतात. आणि नुकत्याच समोर आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रियता चार्टच्या अनुसार, गेल्या सहा महिन्यांमध्ये रजनीकांतची लोकप्रियता पाहता, तेच ‘थलायवा’ असल्याचीच गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

रजनीकांतच्या 2018-2019 मध्ये तीन चित्रपट प्रदर्शित झाले. काला, 2.0 आणि पेटा ह्या तीन चित्रपटांमुळे वेबसाइट, ई पेपर आणि वायरल न्यूजमध्ये 5447 अंकांसह रजनीकांत बाकी दक्षिणात्य अभिनेत्यांहून अग्रेसर असल्याचेच समोर आले आहे. आणि गेल्या सहा महिन्यांमधल्या रँकिंगनूसार, तर 100 पैकी 100 गुणांसह रजनीकांत लोकप्रियतेत अग्रणी असल्याचेच समोर आले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

मल्याळम इंडस्ट्रीचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन ह्या लोकप्रियतेच्या चार्टमध्ये 4223 गुणांसह दूसऱ्या स्थानी आहे. 100 मधून 77.53 गुण मिळवून आपल्या चाहत्या वर्गाच्या प्रेमामूळे स्कोर ट्रेंड्सच्या लोकप्रियतेच्या चार्टवर पृथ्वीराज दूसऱ्या क्रमांकावर आहे.

3829 गुणांसह बाहुबली फेम प्रभास लोकप्रियतेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.  बाहुबलीनंतर प्रभासची लोकप्रियता दक्षिणमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही वाढलीय. त्यामूळेच 100 मधून 70.30 गुणांसह प्रभास तिसऱ्या पदावर आहे. 

आपल्या महर्षी चित्रपटामूळे 3489 गुणांसह महेशबाबू चौथ्या स्थानी आहे. तर 2018 मध्ये रिलीज झालेली महेश बाबूची ‘भारत अने नेनू’ टॉप ग्रॉसर फिल्म असल्यामूळेही त्याच्या लोकप्रियतेत वाढ झालेली आहे. महर्षीमूळे तर जगभरात महेशबाबूच्या फॅनफॉलोविंग चांगलीच वाढ झालीय. म्हणूनच 64.05 गुणांसह महेश बाबू चौथ्या स्थानी आहे.  

सुपरस्टार मोहनलालच्या ‘लुसिफर’ आणि ‘ओडियन’ ह्या दोन फिल्म्सनी चांगलीच लोकप्रियता मिळवली. म्हणूनच स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर 3294 गुणांसह मोहनलाल पांचव्या स्थानी आहेत. मोहनलाल यांच्या चाहतावर्गामूळे 100 पैकी 60.47 गुण मिळवून ते लोकप्रियतेत पाचव्या पदावर आहेत.  

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “प्रभास आणि महेश बाबू ह्या दोघांची प्रचंड फॅनफॉलोविंग आहे. सोशल प्लेटफॉर्म, न्यूज़पेपर आणि वायरल न्यूज़ रैंकिंग मध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहेत. पण थलायवा रजनीकांत आणि सुपरस्टार मोहनलाल ह्यांची अनेक वर्षांची लोकप्रियता असल्याने त्यांना लोकप्रियतेत मागे टाकणेच अनेक स्टार्सना सहज शक्य नाही. पृथ्वीराजची सुध्दा मासेस आणि क्लासेसमध्ये चांगलीच लोकप्रियता आहे. “

टॅग्स :रजनीकांतमहेश बाबूप्रभास