Join us

एकटे असाल तरच पाहा ! या अभिनेत्रीने शेअर केला बाथरूमधला फोटो, पाहून फॅन्सही झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 16:29 IST

उर्वशी रौतेलाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे. शॉवर घेतानाचा हा तिचा फोटो आहे.फोटो 'सनम रे' सिनेमाच्या सीनमधला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून  उर्वशी रौतेला नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.  तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. 

उर्वशीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे. शॉवर घेतानाचा हा तिचा फोटो आहे. उर्वशीचा हा फोटो सनम रे सिनेमाच्या सिनमधला आहे. हा व्हिडीओही मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तुर्तास या फोटोत उर्वशीचा हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे.

सेक्सी पोज दिलेला हा उर्वशीचा फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. हा फोटो पाहून चाहते तुफान कमेंटस आणि लाईक्स करत धुमाकुळ घालत आहेत. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. 

उर्वशी रौतेला आताच्या अभिनेत्रींपैकी एक आहे जी बॉलीवूड मध्ये स्वतःच्या हिंमतीवर आपले स्थान निर्माण करत आहे. अभिनेत्री आपल्या कामाच्या कौशल्याने यशाच्या शिखरावर पोहचली आहे म्हणून उर्वशी रौतेलाने आपले मानधन वाढवण्याचा विचार केला आहे. उर्वशीने आपल्या आधीच्या मानधनातून वेतन वाढवून चक्क 7 कोटी केले आहे.

टॅग्स :उर्वशी रौतेला