Join us

समुद्र किनारी अनुष्का शर्मा दिसली बेबी फ्लॉन्ट करताना, 45 लाखांहून जास्त लोकांनी फोटोला दिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 18:32 IST

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे. ही माहिती खुद्द त्यांनीच फोटो शेअर करत सोशल मीडियावर दिली आहे. अनुष्का शर्माच्या प्रेग्नेंसीचे वृत्त ऐकल्यापासून त्यांचे चाहते त्यांची झलक पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. जो फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या फोटोला आतापर्यंत 45 लाखांहून जास्त लोकांनी पसंती दिली आहे आणि या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. 

अनुष्का शर्माचा हा फोटो पाहून असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही की झगमगाटापासून दूर राहत प्रेग्नेंसी एन्जॉय करताना दिसते आहे. या व्हायरल झालेल्या फोटोतील अनुष्काचा सिम्पल लूक लोकांना खूप भावतो आहे. अनुष्काने हा फोटो शेअर करत लिहिले की, यापेक्षा जास्त खरे आणि सुखद जाणीव काहीच नाही की तुमच्या आत एका नवीन जीवनाची निर्मिती होत आहे. याचा तुमच्यावर कोणताही कंट्रोल नसता तर मग ते काय असते? विराट आणि अनुष्काने नुकतेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते की पुढील वर्षी जानेवारीत ते दोघे आई-बाबा होणार आहेत.

इटलीत पार पडले होते लग्न

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न 11 डिसेंबर, 2017मध्ये इटलीमध्ये झाले होते. लग्नानंतर त्यांनी दिल्ली आणि मुंबईमध्ये रिसेप्शन दिले होते. विराट आणि अनुष्काने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील आमंंत्रण दिले होते. त्या वर्षी त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी देशच नाही तर जगभरातील लोक उत्सुक झाले होते. विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत आणि दोघे एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.

विना मेकअप आणि नवीन हेअरस्टाईलमध्ये दिसली प्रियंका चोप्रा, नवरा निक जोनससोबत रोमँटिक मूडमधील पहा फोटो

शेवटची झळकली झिरोमध्ये

अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अनुष्का शर्मा शेवटची शाहरूख खान अभिनीत झिरोमध्ये झळकली होती. यात कतरिना कैफदेखील मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर अनुष्काने आपले पूर्ण लक्ष चित्रपट आणि वेबसीरिजच्या निर्मितीकडे केंद्रीत केले. तिच्या प्रोडक्शन हाउसची नुकतीच बुलबुल ही वेबफिल्म रिलीज झाली. 

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली