प्रियंका चोप्राला कोणते शहर आवडते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 17:10 IST
बॉलिवुडची तगडी कलाकार प्रियंका चोप्रा हिला नुकतेच आसामची नवनियुक्त बँड अॅम्बेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र प्रियांका आसाम ...
प्रियंका चोप्राला कोणते शहर आवडते?
बॉलिवुडची तगडी कलाकार प्रियंका चोप्रा हिला नुकतेच आसामची नवनियुक्त बँड अॅम्बेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र प्रियांका आसाम या शहराविषयी सांगते, मी आतापर्यंत जगातील सर्वाधिक सुंदर पर्यटन स्थळांना भेट दिली असली तरी आसामच्या मात्र खरोखर प्रेमात पडले आहे. मी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकवेळा गुवाहाटीला आले असून त्या अल्पकालीन भेटींतही इथली झलक अनुभवल्याने माज्या मनात हे शहर व राज्याचा आणखी आणखी ओळख व्हावी अशी प्रबळ इच्छा जागृत झाली. आज कामाख्या मंदिरासारख्या सुंदर ठिकाणाला भेट दिल्यावर तर आसामचे अनुपम सौंदर्य जगापुढे उघड करण्याचा निश्चय मी केला आहे, कारण येथे बघण्यासारखे खूप आहे. आसामच्या प्रेमात पडावे, अशी बरीच कारणे आणि संधी येथे उपलब्ध आहेत. मी माज्या संघासमवेत येथे अनेकदा चर्चा केल्या आहेत. आसाम केवळ भारतीय पर्यटकांनाच नव्हे, तर जगालाही खूप काही देऊ शकतो. आसामची ब्रँडअॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती होणे माज्यासाठी गौरवास्पद आहे. आता आसामचा शोध घेऊन त्याचे सौंदर्य जगापर्यंत पोचवण्यासाठी मी उत्सुक आहे. आसाम हे जगातील सर्वाधिक नैसर्गिक सौंदयार्ने नटलेल्या पर्यटन स्थळांपैकी असून आजही काँक्रिटीकरणाच्या दुष्परिणामांपासून दूर राहिले आहे. आसाम हे आपुलकीने समृद्ध खेड्यांचे आणि साध्या, सुंदर लोकांचे राज्य आहे. प्रियकांने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने बॉलिवुडमध्ये अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर ती सध्या हॉलिवुडमध्ये आपले स्थान निर्माण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच तिने मराठी चित्रपटसृष्टीतदेखील पदापर्ण केले आहे. तिने व्हेटिंलेटर हा मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर या चित्रपटात तिने एक गाणेदेखील गायले आहे. प्रियंकाचा हा चित्रपट आणि तिचे गाणे दोन्ही ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.