Join us
Daily Top 2Weekly Top 5

'वेलकम' फेम 'मामी' आता कुठे आहे? काय करतेय ती? चेहऱ्यात बराच झालाय बदल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 13:26 IST

Supriya Karnik : मराठमोळ्या अभिनेत्री सुप्रिया कर्णिक या मुळच्या मुंबईतीलच. अनेकांना आठवत असेल की, त्या 'तिसरा डोळा'' या गाजलेल्या मराठी मालिकेत अभिनेते रमेश भाटकर यांच्यासोबत झळकल्या होत्या

'वेलकम' सिनेमातील सगळ्याच भूमिका लोकप्रिय आहेत. मजनू भाई असो वा शेट्टी किंवा मामा असो वा मामी. सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. या सिनेमात परेश रावल यांच्या पत्नीची म्हणजे मामीची भूमिका अभिनेत्री सुप्रिया कर्णिक यांनी साकारली होती. त्या सिनेमानंतर त्या फारशा दिसल्या नाहीत. पण त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पण सध्या 'मामी' काय करतात आणि कुठे आहेत हे अनेकांना माहीत नाही. 

मराठमोळ्या अभिनेत्री सुप्रिया कर्णिक (Supriya Karnik) या मुळच्या मुंबईतीलच. अनेकांना आठवत असेल की, त्या 'तिसरा डोळा'' या गाजलेल्या मराठी मालिकेत अभिनेते रमेश भाटकर यांच्यासोबत झळकल्या होत्या. या मालिकेतून त्यांना लोकप्रियता मिळाली होती. याशिवाय त्या अनेक हिंदी मालिका आणि सिनेमातही दिसल्या.

अभिनेत्री सुप्रिया कर्णिक मुंबईतच लहानाच्या मोठ्या झाल्या. नंतर सौदी अरेबियाला काही वर्षे बुरखा घालून एअर होस्टेसचे काम केले. मात्र तेथील कामला कंटाळून त्या पुन्हा भारतात परतल्या. पुन्हा मालिकांत काम करण्याची इच्छा झाली आणि काम मिळाले. त्या काळातील  'शांती' या गाजलेल्या मालिकेने त्यांना लोकप्रियता दिली. त्यानंतर 'वो रेहनेवाली मेहलों की', 'कानून', 'तेहकीकात' अशा तूफान गाजलेल्या मालिकांमध्ये त्या दिसल्या.

त्याशिवाय 'बेवफा', 'राजा हिंदुस्थानी', 'यादे', 'जोडी नंबर १', 'ताल', 'जिस देश मी गंगा रहता है', 'वेलकम बॅक' अशा जवळपास ५० हून अधिक हिंदी सिनेमात त्या दिसल्या. 'लेक लाडकी' या मराठी सिनेमातही त्यांनी काम केले आहे. त्या दिसणं एकदम हाय प्रोफाइल असल्याने त्यांनी मालिका आणि सिनेमात भूमिकाही तशाच केल्या. आज सुप्रिया अभिनयापासून थोड्या दुरावल्या आहेत. बरीच वर्ष झाली त्या कोणत्या सिनेमात किंवा मालिकेत दिसल्या नाही. अशी चर्चा आहे की, काही वर्षांपासून त्या अध्यात्माकडे वळल्या आहेत.  

टॅग्स :बॉलिवूडइंटरेस्टींग फॅक्ट्स