Join us

​ तमन्ना भाटियाला आत्ता कुठे उमगली चूक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 15:04 IST

‘बाहुबली- दी कन्क्लूजन’ येत्या एप्रिलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीय येत आहे. ‘बाहुबली- दी कन्क्लूजन’ इतकी भारतीय सिनेमाच्या इतिहासात कदाचितच कुठल्या चित्रपटाची ...

‘बाहुबली- दी कन्क्लूजन’ येत्या एप्रिलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीय येत आहे. ‘बाहुबली- दी कन्क्लूजन’ इतकी भारतीय सिनेमाच्या इतिहासात कदाचितच कुठल्या चित्रपटाची इतकी प्रतीक्षा केली गेली असेल. ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’, या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायला लोक आतूर आहेत. ‘बाहुबली: दी बिगीनिंग’ प्रचंड गाजला. या चित्रपटात अवंतिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला या चित्रपटाने प्रचंड लोकप्रीयता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. हा ‘सिलसिला’ तमन्नाला पुढेही कायम ठेवायचा आहे.खरे तर हिंदी सिनेमात तमन्नाच्या वाट्याला फारसे यश आले नाही. बॉलिवूडचे तिचे सर्वच चित्रपट फ्लॉप गेलेत. आता तमन्ना चित्रपटांची निवड करताना चुकली की तमन्नाचे नशीब तिच्यासोबत नव्हते, हे ठाऊक नाही. पण बॉलिवूडमध्ये तमन्नाचे करिअर फारसे झेप घेऊ शकले नाही. मात्र आता तमन्नाला या चुकांची पुनरावृत्ती करायची नाही. त्यामुळेच सध्या तरी ‘ताक सुद्धा फुंकून प्यायचे’ असे तिने ठरवलेय. तमन्ना याबद्दल म्हणते, माझ्याकडे बॉलिवूडच्या अनेक आॅफर्स येत आहेत. आजपर्यंत मी जे काही चित्रपट केलेत, त्यात माझा परफॉर्मन्स हायलाईट झाला नाही. पण यापुढे मी साईन केलेला प्रत्येक चित्रपट परफॉर्मन्स बेस्ड असेल. एकंदर काय तर तमन्ना आता ‘परफॉर्मन्स’ करायला शिकली म्हणायची.ALSO READ : ​‘बाहुबली’ गर्ल तमन्ना भाटियाबद्दलचे हे ‘सत्य’ तुम्हाला माहित आहे का?​‘बाहुबली’च्या हिरोईनने सोडली कपिल शर्माची साथ, पण का?‘बाहुबली2’ या आगामी चित्रपटाबद्दलही तमन्ना बोलली. या चित्रपटाबद्दल मी बरीच उत्सूक आहे. ‘बाहुबली’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘बाहुबली2’ला सुद्धा असाच  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा, अशी माझी अपेक्षा आहे. ‘बाहुबली’चा पहिला पार्ट आला तेव्हा मनात धाकधूक होती. कारण हा साऊथचा सिनेमा होता. प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतील, याबाबत शंका होती. पण असे असूनही या चित्रपटाला लोकांनी प्रचंड प्रेम दिले. ‘बाहुबली- दी कन्क्लूजन’ला सुद्धा प्रेक्षकांचे अनेक प्रेम मिळावे, असे ती म्हणाली.