Join us

सलमान खानची ही हिरोईन बॉलिवूड सोडून परदेशात करतीये बक्कड कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 17:24 IST

सलमान खानच्या 'सनम बेवफा' सिनेमातील चांदनी ही अभिनेत्री तुम्हाला चांगलीच लक्षात असेल. चांदनीचा हा पहिला सिनेमा होता.

मुंबई : सलमान खानच्या 'सनम बेवफा' सिनेमातील चांदनी ही अभिनेत्री तुम्हाला चांगलीच लक्षात असेल. चांदनीचा हा पहिला सिनेमा होता. हा सिनेमा चांगलाच हिट ठरला होता. त्यानंतर तिचे बाकीचे सिनेमे फार गाजले नाहीत. त्यामुळे ती बॉलिवूडपासून दूर गेली. 

पण तिला सिनेमांचा मोह काही त्यागता आला नाही. चांदनीचं बॉलिवूडवर किती प्रेम आहे हे यावरुन लक्षात येतं की तिने आपलं नवोदिता शर्मा हे नाव सोडून सिनेमातील चांदनी हे नाव स्विकारलं. इतकेच नाही तिने तिच्या दोन मुलींची नावेही करिना आणि करिश्मा ही ठेवली आहेत. 

आज चांदनी भलेही बॉलिवूडपासून दूर आहे. पण परदेशात चांगलीच चर्चेत आहे. सिनेपासून दूर गेल्यावर चांदनी आता डान्स टिचर झाली आहे. बॉलिवूडमधून एक्झिट घेतल्यानंतर ती पुन्हा कधीही बॉलिवडमध्ये आली नाही. पण आज ती काय करतेय हे वाचून तुम्हाला आनंद होईल. 

आज चांदनी देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ करत आहे. चांदनी ऑरलेंडोमध्ये एक डान्स इन्स्टीट्यूट चालवते. डान्स शिकवण्यासोबतच चांदनीने इंटरनॅशनल लेव्हलचे शो सुद्धा केले आहेत. 

फार कमी लोकांना माहीत आहे की, चांदनी पाच वर्षांची असतानापासून मॉडर्न आणि क्लासिकल डान्सचं ट्रेनिंग घेत होती. पण तिने सिनेमात काम करणे पसंत केले. पण एका हिट सिनेमानंतर तिला फार यश मिळालं नाही. त्यामुळे तिने डान्स क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटीचांदनी