Join us

​ रिहा चक्रवर्तीचे ‘हे’ फोटो पाहताना तुमचे डोळे पांढरे झालेच म्हणून समजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 13:06 IST

रिहा चक्रवर्ती ही बॉलिवूडची हॉट गर्ल सध्या जाम चर्चेत आहे आणि असणार का नाही, हॉलिवूड हॉटी किम कर्दाशियनला मागे पाडण्याचे जे तिने ठरवलेय. होय, तुमचा विश्वास बसणार नसेल तर तुम्ही तिचे हे व्हायरल झालेले काही फोटो पाहायलाच हवेत. या फोटोंमध्ये रिहाने सगळ्या मर्यादा ओलांडल्यात.

रिहा चक्रवर्ती ही बॉलिवूडची हॉट गर्ल सध्या जाम चर्चेत आहे आणि असणार का नाही, हॉलिवूड हॉटी किम कर्दाशियनला मागे पाडण्याचे जे तिने ठरवलेय. होय, तुमचा विश्वास बसणार नसेल तर तुम्ही तिचे हे व्हायरल झालेले काही फोटो पाहायलाच हवेत. या फोटोंमध्ये रिहाने सगळ्या मर्यादा ओलांडल्यात. या फोटोंना रिहाने ‘क्यूट नो मोअर’ असे कॅप्शन दिलेयं. यातील तिच्या एकापेक्षा एक हॉट अदा पाहताना तुमचे डोळे पांढरे झालेच म्हणून समजा. रिहाने २०१३ मध्ये बॉलिवूड डेब्यू केले होते. ‘मेरे डॅड की मारूती’ या चित्रपटात रिहा दिसली होती. यानंतर पुढच्याच वर्षी ‘सोनाली केबल’ या चित्रपटात रिहा झळकली होती. यानंतर दीर्घकाळापासून रिहा कुठल्याच चित्रपटात दिसली नाही. लवकरच रिहा ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटात दिसणार आहे. यात ती अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर या दोघांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय रितेश देशमुख आणि विवेक ओबेराय यांच्या ‘बँक चोर’ या चित्रपटातही रियाचा अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे. यंदा रिहाचे हे दोन्ही सिनेमे रिलीज होणार आहेत. आता त्यापूर्वी चर्चेत तर राहायलाच हवे ना. कदाचित त्यासाठीच रिहाचा हा सर्व खटाटोप सुुरू आहे. सोशल नेटवर्कींग साईटवर काही हॉट अ‍ॅण्ड बोल्ड फोटो पोस्ट करा आणि लोकांचे लक्ष वेधून घ्या, असा सध्या ट्रेन्ड आलाय. या ट्रेन्डचा फायदा रिहाने घेतला तर काय बिघडले? होय ना? यामुळे दोन गोष्टी घडतात, एक तर लोकांचे ‘अटेन्शन’ मिळते अन् दुसरे म्हणजे, चर्चाही घडते. सो, कॅरी आॅन रिहा...!!