Join us

शाहरुख खानला पहिल्यांदा भेटल्यावर जुही चावलाने दिली होती 'ही' प्रतिक्रिया.. वाचून तुम्हाला येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 14:34 IST

जेव्हा शाहरुख खानने १९९२ मध्ये आपल्या करियरला सुरवात केली तेव्हा कोणाला माहीत होते की एवढा उंचीने कमी असेला हिरो ...

जेव्हा शाहरुख खानने १९९२ मध्ये आपल्या करियरला सुरवात केली तेव्हा कोणाला माहीत होते की एवढा उंचीने कमी असेला हिरो एकद दिवस बॉलिवूडचा किंगखान बनेल. १९९२ मध्ये राजू बन गया जेंटलमनसाठी जुही चावलाच्या अपोजिट शाहरुख खानला साईन करण्यात आले होते. हे जेव्हा जुहीला कळले तेव्हा तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला, दिग्दर्शक अझिज मिर्झाने तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण जुहीचावला कोणत्याही नवीन चेहऱ्याबरोबर काम करायचे नव्हते.शाहरुखच्या तुलना तेव्हा जुहीचे करिअर इंडस्ट्रिमध्ये सेटल झाले होते आणि लोक तिच्या चेहऱ्याला ओळखाला लागली होती. म्हणून तिला कोणत्याही नवीन कलाकारासोबत नाव जोडणे मान्य नव्हते पण दिग्दर्शक अझिज मिर्झा हा चित्रपट जुही शिवाय बनवायला तयार नव्हते. त्यांनी जुहीला सांगितले की शाहरुख खान 'फैजी' मालिकेमुळे प्रसिद्ध झाला आणि त्याचे फॅन फॉलोव्हिंग ही भरपूर आहे आणि त्याचा आपल्याला फायदा होईल. त्यांनी जुहीला शाहरुखला एकदा भेटून निर्णय घेण्याचे सुचवले.जुहीने एकदा तिच्या मुलाखतीत सांगितले होते की जेव्हा मी शाहरुखला पहिल्यांदा पाहिले तेव्हा हा कसा काय हिरोचा रोल करणार याबद्दल शंकाच वाटत होती ती म्हणाली, मी जेव्हा सेटवर आली तेव्हा हा उंचीने कमी असलेले मुलगा ज्याचा अर्ध्या पेक्षा जास्त चेहरा त्याच्या वाढलेल्या केसांनी लपला आहे तो माझ्याकडे चालत येत होता. दिग्दर्शक अझिज मिर्झाने मला सांगितले की, हा तुझा हिरो असणार आहे तेव्हा मला माझे हसू आवरणे कठिण झाले होते. मी त्यावेळी खूप हसले होते. पण पुढे शूटिंगच्या दरम्यान त्या दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली आणि अर्थात चित्रपट ही हिट झाला. त्यानंतर शाहरुख आणि जुहीची जोडी प्रेक्षकांची फेव्हरेट झाली. शाहरुख आणि जुही आजही एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रिण आहेत आणि ते बिझनेस पार्टनर हि आहेत. जुही चावला सध्या फक्त बिझनेसवर लक्ष केंद्रीत केले आहे तर शाहरुख आजही चित्रपटात हिरोची भूमिका साकारतो आहे. काहि दिवसांपूर्वीच तो अनुष्का शर्मासोबत जब हॅरी मेट सेजल चित्रपट झळकला होतो.