Join us

"शाहरुख खानसोबत शारीरिक संबंध होते का?", प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:20 IST

करण जोहर आणि अभिनेता विवेक वासवानी यांच्यासोबत शाहरुख रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. एवढंच नव्हे तर शाहरुखचे यांच्यासोबत शरीर संबंध असल्याच्या चर्चाही होत्या. 

सिनेइंडस्ट्रीत अनेक कलाकारांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. काही कलाकारांची नावं तर एकापेक्षा जास्त जणांसोबत जोडली गेली आहे. बॉलिवूडचा बादशहाही यातून सुटलेला नाही. शाहरुख खानचं नावही अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. पण, केवळ अभिनेत्रीच नव्हे तर काही अभिनेत्यांसोबतही त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. करण जोहर आणि अभिनेता विवेक वासवानी यांच्यासोबत शाहरुख रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. एवढंच नव्हे तर शाहरुखचे यांच्यासोबत शरीर संबंध असल्याच्या चर्चाही होत्या. 

शाहरुख खान आणि विवेक वासवानी हे चांगले मित्र होते. मात्र यांच्यात केवळ मैत्री नसून शारीरिक संबंध असल्याचं बोललं जात होतं. या सर्व चर्चांना विवेक वासवानी यांनी उत्तर देत शाहरुखसोबतच्या नात्यावर सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं होतं. "तू आणि शाहरुख रिलेशनशिपमध्ये होतात का?" असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी "रिलेशनशिप म्हणजे सेक्शुअल रिलेशनशिप? नाही शाहरुख तसा नाही", असं उत्तर दिलं होतं. 

"मला माहीत नाही ही अफवा कुठून आली. पण, मी घरी होतो. माझे आईवडीलही होते. माझं करिअर होतं. त्याला लवकर गौरीसोबत लग्न करायचं होतं. या सगळ्यात रिलेशनशिप कुठून आलं? आमच्यात फक्त मैत्री होती. फिजिकल रिलेशनशिपबाबत तो विचारही करू शकत नाही", असं विवेक वासवानी म्हणाले होते. सुरुवातीला इंडस्ट्रीत स्ट्रगल करताना शाहरुख खान आणि विवेक वासवानी एकत्र राहत होते. त्यामुळे त्यांच्यात रिलेशनशिप असल्याच्या चर्चा होत्या. विवेक शाहरुखचा खर्च करायचे असंही बोललं जात होते. 

टॅग्स :शाहरुख खानसेलिब्रिटी