Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सोहाच्या घरी कधी हलणार पाळणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 19:39 IST

सैफ अली खानची गुणी बहीण सोहा अली खान गतवर्षी कुणाल खेमूसोबत विवाहबंधनात अडकली. मध्यंतरी सोहा व कुणालमध्ये काहीतरी बिनसल्याची ...

सैफ अली खानची गुणी बहीण सोहा अली खान गतवर्षी कुणाल खेमूसोबत विवाहबंधनात अडकली. मध्यंतरी सोहा व कुणालमध्ये काहीतरी बिनसल्याची बातमी आली. कुणालला कुटुंब वाढवायचे आहे व सोहा यासाठी सध्या राजी नाही. म्हणून कुणाल नाराज असल्याचे कारण यासाठी दिले गेले. अर्थात कुणालने हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले. पण तरिही सोहाच्या घरी पाळणा कधी हलणार, ही उत्सूकता मागे उरलीच. याबाबत खुद्द सोहा हिलाच विचारण्यात आले. यावर सोहाने काय उत्तर दिले माहितीयं??? ती खळखळून हसली.  जेव्हा अशी काही गोड बातमी असेल, तेव्हा सर्वांत आधी तुम्हालाच कळेल, असे उत्तर तिने दिले. शाहीद कपूरची पत्नी मीरा हिच्याकडे सध्या गुड न्यूज आहे. जेनेलिया देशमुख ही दुसºयांदा आई होणार आहे. राणी मुखर्जी हिने अलीकडेच एका गोड मुलीला जन्म दिला आहे. या यादीत सोहाचे नाव कधी येते, याची प्रतीक्षा आहे...तूर्तास तरी आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार, असेच दिसतेयं...