Join us

जेव्हा श्रद्धा हसीनाच्या कुटुंबियांना भेटते ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 17:02 IST

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकची चलती आहे. कलाकारही बायोपिकमध्ये काम करण्यास उत्सूक आहे. पण बायोपिक संबंधित व्यक्तीचा स्वभाव, त्याचे गुणविशेष, त्याची ...

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकची चलती आहे. कलाकारही बायोपिकमध्ये काम करण्यास उत्सूक आहे. पण बायोपिक संबंधित व्यक्तीचा स्वभाव, त्याचे गुणविशेष, त्याची देहबोली, या सगळ्यांवर मेहनत घेणे आलेच. सध्या  रॉक आॅन २’ फेम अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सुद्धा अशाच एका बायोपिकसाठी जीवतोड मेहनत घेतेयं.हसीना पारकर हिच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये श्रद्धा हसीनाची भूमिका साकारते आहे. या  चित्रपटासाठीचे फोटोशूट नुकतेच मुंबईत पार पडले. त्यावेळी पारकर कुटुंबीय तिथे उपस्थित होते. त्यांच्यासोबत गप्पा मारण्याची संधी श्रद्धा  कशी सोडणार होती? कारण यानिमित्ताने हसीनाची स्वभाववैशिष्ट्ये तिला जाणून घेता येणार होती. श्रद्धाने ही संधी नेमकी ‘कॅश’ केली.अपूर्वा लाखिया दिग्दर्शित या बायोपिकमध्ये श्रद्धाच नव्हे तर तिचा भाऊ सिद्धांत कपूर दाऊद इब्राहीमची भूमिका साकारणार आहे तर श्रद्धा त्याची दाऊदची रिअल बहीण हसीनाची भूमिका करणार आहे. बँकॉकमध्ये चित्रपटाचे शूटिंग्ही सुरू झाले आहे. श्रद्धा मात्र जानेवारीत टीमला जॉईन करेल. सध्या चित्रपटाची टीम हसीनाच्या वापरातील काही वस्तूंवर विशेष काम करत आहे. विशेषत: हसीनाची नोजरिंग. डिझायनर इका लाखानी यांच्याकडून हे नोजरिंग बनवून घेतले जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा  आणि सिद्धांत हे दोघे भाऊ-बहिण प्रथम स्क्रीन शेअर करणार आहेत.