Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा तिला सेटवरुन हटवलं.......

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 09:44 IST

पाठीवर बॅग, हॉकी स्टिक आणि पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधली ही मुलगी कोण आहे. असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र थोडं लक्षपूर्वक ...

पाठीवर बॅग, हॉकी स्टिक आणि पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधली ही मुलगी कोण आहे. असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र थोडं लक्षपूर्वक पाहिलं तर लक्षात येईल की ही आहे अभिनेत्री आलिया भट्ट. तिचा हा लूक आहे आगामी उडता पंजाब या सिनेमातील. या सिनेमात आलिया हॉकी प्लेयरची भूमिका साकारतेय जी बिहारमधल्या एका खेड्यात राहणारी आहे.. हॉकी तिच्यासाठी जीव की प्राण आहे. या भूमिकेसाठी आलियानं बरीच मेहनत घेतली. तिच्यामध्ये खूप बदल पाहायला मिळतोय. हा बदल इतका आहे की या सिनेमातील सीनसाठी आलिया तयार होऊन सेटवर आली. मात्र त्यावेळी आलियाला कुणीही ओळखलं नाही. काहींनी तर बाहेरील व्यक्ती म्हणून तिला सेटवरुन जाण्यासाठी हटकलं. मात्र अखेर त्या व्यक्तीलाही आपली चूक उमगली आणि सीन पूर्ण झाला. सिनेमातील इक कुडी गाण्याच्या रिलीजवेळी आलियानं हा किस्सा शेअर केला. आलियाचा हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय.