पान मसाल्याची जाहिरात केल्याने शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांना कायमच ट्रोल केलं जातं. काही दिवसांपूर्वीच युट्यूबर ध्रुव राठीने पान मसाल्याची जाहिरात करण्यावरुन शाहरुखला ट्रोल केलं होतं. "इतकी अफाट संपत्ती असूनही शाहरुख खान आरोग्याला हानिकारक उत्पादनांची जाहिरात का करतो?", असा प्रश्न त्याने किंग खानला विचारला होता. याशिवाय शाहरुखच्या संपत्तीचा लेखाजोगाही ध्रुव राठीने वाचला होता.
ध्रुव राठीच्या या व्हिडीओनंतर शाहरुखचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एका मुलाखतीत शाहरुखने कोल्ड ड्रिंक आणि पान मसाला जाहिरातीबाबत भाष्य केलं होतं. करण थापरला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख म्हणाला होता की, "हे प्रोडक्ट बॅन व्हावेत म्हणून मी त्या ऑथोरिटीकडे तक्रार करू शकतो. आपल्या देशात ते विकले गेले नाही पाहिजेत. जर धुम्रपानामुळे धोका आहे तर सिगारेटचं उत्पादनच झालं नाही पाहिजे. जर तुम्हाला वाटतं की कोल्ड ड्रिंक वाईट आहे. ते एका विषासारखं आहे. तर त्याचं उत्पादन होऊ देऊ नका".
"तुम्ही याचं उत्पादन थांबवत नाही कारण यातून तुम्हाला पैसे मिळत आहेत. खरं सांगायचं झालं तर जर तुम्हाला वाटतंय की हे प्रोडक्ट हानिकारक आहेत. तर त्याचे उत्पादन थांबले पाहिजे. पण, तसं होत नाहीये. कारण सरकारला त्यातून पैसे मिळत आहेत. त्यामुळे माझं इनकमही थांबवू नका. मी एक अभिनेता आहे. माझ्या कामातूनच मला पैसे मिळतात. जर तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर त्याचं उत्पादनच घेऊ नका. इतकी साधी गोष्ट आहे", असंही शाहरुख म्हणाला होता.
Web Summary : Shah Rukh Khan faced criticism for endorsing pan masala. He responded by stating that if the government profits from its sale, his income shouldn't be questioned. He emphasized that if harmful, production should cease entirely.
Web Summary : पान मसाला का समर्थन करने के लिए शाहरुख खान की आलोचना हुई। उन्होंने जवाब दिया कि अगर सरकार इसकी बिक्री से लाभ कमाती है, तो उनकी आय पर सवाल नहीं उठाया जाना चाहिए। उन्होंने जोर देकर कहा कि अगर हानिकारक है, तो उत्पादन पूरी तरह से बंद हो जाना चाहिए।