Join us
Daily Top 2Weekly Top 5

करीना कपूर आंटी म्हणणं साराच्या आलं होतं अंगाशी, चांगलाच भडकला होता सैफ अली खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 13:59 IST

एका टॉक शोमध्ये सारा अली खानने हा किस्सा सांगितला होता.

सैफ अली खान आणि करीना कपूर खान बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीपैंकी एक आहे. मात्र सैफच्या जीवनात करीनाच्या आधी अमृता सिंग होती. खरेतर सैफ अली खानने आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या काळात अमृता सिंगसोबत लग्न केले होते. अमृतापासून सैफला दोन मुले आहेत सारा अली खान आणि इब्राहीम अली खान. ते दोन मुलांचे पालक भलेही झाले पण त्यांचे नाते टिकू शकले नाही. अमृताला घटस्फोट दिल्यानंतर सैफ अली खानने करीना कपूरसोबत लग्न केले. लग्नानंतर सारा अली खान कन्फ्यूज होती की ती करीना कपूरला काय संबोधेल. सैफ आणि करीनाच्या लग्नानंतर घडलेला एक भन्नाट किस्सा सारा अली खानने एका टॉक शोमध्ये सांगितला आहे.

करीना तिच्या सारा आणि तिच्या भावाशी एखाद्या मैत्रिणीसारखं वागते. त्यांच्याशी सगळ्या विषयावर चर्चा करते. पण सुरूवातीला साराच्या मनात करीनाविषयी शंका होती. करीना एवढी मोठी सुपरस्टार असल्यामुळे ती आपल्याशी नीट वागेल का असा प्रश्न तिला पडला होता. पण करीनाने कधीच तिचे स्टारडम नात्यात आणले नाही, असे सारा सांगत होती.

करीना लग्न होऊन घरी आल्यावर तिला काय हाक मारायची असा प्रश्न तिला पडला होता. करीनाला बेबो म्हणावे असे तिला वाटत होते. त्यानंतर आंटी म्हणावे का असा प्रश्न तिला पडला होता. शेवटी तिने सैफलाच हा प्रश्न विचारला. तिचा हा प्रश्न ऐकून सैफ अली खान चांगलाच भडकला.

सैफ म्हणाला, आंटी कोणाला म्हणतेस? करीनाला आंटी म्हटले तर ते तिला अजिबात आवडणार नाही. तिला आंटी सोडून अजून काहीही म्हण. सारालाही सैफचे म्हणणे पटले आता सारा अली खान तिला ‘के’ या नावाने हाक मारते.

टॅग्स :सारा अली खानसैफ अली खान