Join us  

सलमान खान ‘पर्सनल’ होतो तेव्हा... दीपिका पादुकोणला विचारला होता प्रेग्नंसी प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:24 PM

नोव्हेंबर 2018 मध्ये दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचे धुमधडाक्यात लग्न झाले आणि यानंतर काहीच महिन्यांत दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

ठळक मुद्देदीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलाल तर लवकरच ती ‘83’ या सिनेमात दिसणार आहे.

नोव्हेंबर 2018 मध्ये दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचे धुमधडाक्यात लग्न झाले आणि यानंतर काहीच महिन्यांत दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. इतक्या की सलमान खाननेही दीपिकाची फिरकी घेत, तिला तिच्या प्रेग्नंसीवरून डिवचले होते.‘छपाक’च्या प्रमोशनसाठी दीपिका सलमान खानच्या ‘बिग बॉस’मध्ये गेली होती. ‘बिग बॉस’च्या सेटवर दीपिका व सलमान दोघांनीही जाम मस्ती केली होती. याचदरम्यान सलमानने दीपिकाला काही प्रश्नही केले होते.  चाहत्यांना लवकरात मुलं बघायचे आहे. चाहते उतावीळ आहे, असे सलमान दीपिकाला गमतीगमतीत म्हणाला होता. त्याचा इशारा दीपिकाच्या प्रेग्नंसीकडे होता. मात्र दीपिकाने हा वार सलमानवरच उलटवला होता. 

चाहत्यांना मुलं बघायचे तर तुला आधी लग्न करावे लागणार, असे म्हणत उलट तिने सलमानची फिरकी घेतली होती. सलमान बिचारा यावर निरूत्तर झाला होता. मग काय, ही चर्चा फार न लांबवता त्याने या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

‘छपाक’च्या प्रमोशनदरम्यान दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना कमालीचा जोर चढला होता. प्रत्येक प्रमोशनल इव्हेंटमध्ये तिला प्रेग्नंसीबद्दलचा प्रश्न विचारला जात होता. इतका की दीपिका जाम वैतागली होती. एका पत्रकार परिषदेत एका पत्रकारानेही हाच प्रश्न विचारल्यावर दीपिकाचा भडका उडाला होता. मी तुला प्रेग्नंट दिसतेय का? मला बेबी प्लान करायचा झाल्यास मी नक्कीच तुला विचारून करेल. तू परवानगी दिली तरच मी बेबी प्लान करेल, अशा शब्दांत ती त्या पत्रकारावर भडकली होती.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलाल तर लवकरच ती ‘83’ या सिनेमात दिसणार आहे. यात तिचा पती रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. तो माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटियाची भूमिका दीपिका वठवणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणसलमान खान