Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा न्युयॉर्कमध्ये उपचारावेळी चिंटू कपूर आणि त्यांच्या जुन्या मित्रामध्ये रंगली होती गप्पांची मैफल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 10:29 IST

ऋषी कपूर यांच्याप्रमाणेच अनुपम खेर यांनीही हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. ऋषी कपूर यांना भेटून बरं वाटल्याची पोस्ट त्यांनी या व्हिडीओसह शेअर केली होती.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेत सगळ्यांना मोठा धक्का दिला. काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अख्खे बॉलिवूड शोकमग्न झाले आहे. चाहतेही शोकाकूल आहेत. 

गेल्या काही महिन्यांपासून ऋषी कपूर आजारी होती. वैद्यकीय उपचारांसाठी  ते अमेरिकेतही गेले होते. याच दरम्यान ऋषी कपूर यांचा एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमेरिकेत न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फेरफटका मारत असल्याचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. स्वतः ऋषी कपूर यांनी हा व्हिडीओ शेअर केला  होता.  ऋषी कपूर यांच्यासोबत असणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेता अनुपम खेर हे आहे. 

आपल्या जुन्या मित्रासह तणावमुक्त जीवनाचा आनंद घेत असल्याचे ऋषी कपूर यांनी ट्विटमध्ये नमूद केले होते. ऋषी कपूर यांच्याप्रमाणेच अनुपम खेर यांनीही हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. ऋषी कपूर यांना भेटून बरं वाटल्याची पोस्ट त्यांनी या व्हिडीओसह शेअर केली होती. यावेळी विविध विषयांसह भारतातील अनेक गोष्टींवर गप्पा मारुन छान वाटल्याचेही खेर यांनी सांगितलं  होते. 

त्याच दरम्यान अनुपम खेर हे एका मालिकेच्या शूटिंगसाठी अमेरिकेतच होते. वै द्यकिय उपचारांमुळे ते आई कृष्णा कपूर यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकले नव्हते. ऋषी कपूर अचानक अमेरिकेत गेल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं होतं. त्यांना कॅन्सर झाल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. मात्र या निव्वळ अफवा असल्याचे कपूर कुटुंबीयांकडून सांगण्यात आले होते.  

टॅग्स :ऋषी कपूरअनुपम खेर