Join us

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ समोरासमोर येतात तेव्हा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 12:56 IST

सहा वर्षांच्या रिलेशनशीपनंतर रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफने आपले रस्ते बदलले. दोघांनी आपल्या ब्रेकअप मागचे कारण अद्याप सांगितलेले नाही. ...

सहा वर्षांच्या रिलेशनशीपनंतर रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफने आपले रस्ते बदलले. दोघांनी आपल्या ब्रेकअप मागचे कारण अद्याप सांगितलेले नाही. जग्गा जासूसच्या प्रमोशन दरम्यान दोघे एकत्र दिसले होते. मात्र त्यानंतर ते दोघे त्यानंतर एकत्र दिसलेच नाही. अऩुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या रिसेप्शन दरम्यान मुंबईत ते एकमेकांच्यासमोर आले. फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार दोघे पार्टीत थोड्या- थोड्या वेळेच्या अंतराने आले आणि दोघे ही आपल्या मित्र-मौत्रिणींसोबत मस्ती करताना दिसले.  पार्टीची मज्जा घेत असताना एक प्रसंग असा ही आला की ज्याठिकाणी कॅटरिना कैफ उभी होती तिथे रणबीर कपूरचा पोहोचला. कॅट त्यावेळी करण जोहर, अयान मुखर्जी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याशी बोलत होती. मिळालेल्या माहितीनुसार रणबीरचा सामना करण्याची वेळ येऊ नये म्हणून कॅटरिना तिथून गप्पचुप निघून गेली. विराट अनुष्काच्या रिसेप्शनमध्ये कॅटरिनाची बहिण इजाबेल हि तिच्यासोबत दिसली.  ALSO READ :  कॅटरिना कैफची बहीण इसाबेलाला मिळाला ब्रेक; सलमान खानने केले अभिनंदन!दीपिका पादुकोणशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरला कॅटरिना कैफची साथ मिळाली होती. तर दीपिकाला रणवीर सिंगची. मात्र रणबीर आणि कॅटचे नातं सहा वर्षानंतर संपुष्टात आले. सलमान सोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॅटरिना रणबीरच्या जवळ आली होती. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते एकमेकांकडे आकर्षित झाले. मात्र सध्या टायगर जिंदा है च्या शूटिंग दरम्यान कॅटरिनाला तिचे जुनं प्रेम परत मिळाल्याची चर्चा आहे. आबुधाबीमध्ये शूटिंग दरम्यान मस्ती करतानाचे सलमानसोबतचे फोटो  कॅटरिना सोशल मीडियावर शेअर करायची. त्यामुळे सलमान आणि कॅटच्या प्रेम प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. टायगर जिंदा है चित्रपट दोघांनी ऑनस्क्रिन केमिस्ट्री ही प्रेक्षकांचा प्रचंड आवडली आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठड्यात 206 कोटींचा गल्ला जमावला आहे. जग्गा जासूस फ्लॉप झाल्यानंतर कॅटरिना तर ट्युबलाईट फ्लॉप गेल्यानंतर सलमान असे दोघेही एक हिट चित्रपटाच्या शोधात होते. टायगर जिंदा है हा चित्रपट यांच्या एक था टायगर है चा सीक्वल आहे.