Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा राजकुमार रावने शाहरुखला भेटण्यासाठी वेळ मागितला तेव्हा शाहरुखने दिले 'हे' उत्तर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 19:11 IST

आपल्या अभिनयाच्या जोरावर राजकुमार राव याने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का त्याला अभिनेता बनण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली ते.

ठळक मुद्देराजकुमार राव शाहरुख खानला आपलं प्रेरणास्थान मानतो राजकुमार लवकरच श्रद्धा कपूर बरोबर 'स्त्री' सिनेमात दिसणार आहे

आपल्या अभिनयाच्या जोरावर राजकुमार राव याने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का त्याला अभिनेता बनण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली ते. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आहे याची कबुली स्वत: राजकुमारने दिली आहे. 

राजकुमार राव म्हणतो "जेव्हा मी मोठा होत होतो तेव्हा शाहरुख सरांना पाहून नवल वाटत असे, मी नेहमी हाच विचार करायचो की जर मुंबईच्या बाहेरून येऊन जर कोणी इतका यशस्वी होत असेल तर मी का नाही ? हो पण ते एवढे सोपे नक्कीच नव्हते. मी मुंबईत आल्यानंतर मला कोणी काम देत नव्हते मी सारखी ऑडिशन देत होतो".

राजकुमार पुढे म्हणाला "शेवटी तो दिवस उजाडला मला माझ्या मेहनतीचे फळ मिळाले, मला 'लव्ह सेक्स और धोखा' हा सिनेमा मिळाला, सिनेमा रिलीज झाल्यानंतर मला भरपूर प्रेम मिळाले पण माझ्यासाठी खास क्षण तो होता जेव्हा क्वीन सिनेमा प्रदर्शित झाला.

शाहरुख खान बद्दल बोलताना राजकुमार रावने एक प्रसंग सांगितला "मी मुबंईच्या मेहबूब स्टुडिओत शूटिंग करत होतो त्यावेळेस मला असे कळले शाहरुख सर सुद्धा तिथे शूटिंग करत आहेत, मला वाटले हीच संधी आहे त्यांना भेटण्याची मी त्यांना मेसेज केला मला वाटले होते की ते मला ओळखत नाही पण त्यांनी मला भेटायला बोलवले आणि महत्वाची गोष्ट अशी की त्यांना माझ्या बद्दल भरपूर काही माहीत होते. तो दिवस माझ्यासाठी स्पेशल होता मी तर शाहरुख सरांचा फॅन होतोच पण त्यादिवशी मी त्यांचा सर्वात मोठा फॅन झालो." राजकुमार लवकरच श्रद्धा कपूर बरोबर 'स्त्री' नावाच्या विनोदी भयपटामध्ये दिसणार आहे.

टॅग्स :राजकुमार रावशाहरुख खान