जेव्हा मनिषा कोईरालाने नाना पाटेकर आणि आयशा जुल्का यांना पडकले होते 'त्या' अवस्थेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 14:46 IST
नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांचा अग्निसाक्षी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात मनिषा आणि जॅकी श्राॅफ यांची ...
जेव्हा मनिषा कोईरालाने नाना पाटेकर आणि आयशा जुल्का यांना पडकले होते 'त्या' अवस्थेत
नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांचा अग्निसाक्षी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात मनिषा आणि जॅकी श्राॅफ यांची जोडी जमली असली तरी नाना आणि मनिषाच्या अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती. तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नाना आणि मनिषा एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि त्यांनी ही गोष्ट कधीही मीडियापासून लपवून ठेवली नाही. मीडियामध्ये नेहमीच त्यांच्या केमिस्ट्रीची चर्चा होत असे. मनिषा आणि नाना यांच्यात २० वर्षांचे अंतर होते. पण नानाच्या स्वभावामुळे ती त्याच्या प्रेमात पडली.अग्निसाक्षी या चित्रपटाच्यावेळी नाना स्टार होता तर मनिषाने नुकतीच तिच्या करियरला सुरुवात केली होती. नानाचे नीलकांती पाटेकर यांच्यासोबत लग्न झालेले होते तर मनिषाचे विवेक मुश्रनसोबत नुकतेच ब्रेकअप झाले होते. अग्निसाक्षी या चित्रपटाच्या वेळी या चित्रपटाच्या टीममधील सगळ्यांनाच त्यांच्या अफेअरची कल्पना होती. एवढेच नव्हे तर मनिषाच्या शेजारच्यांनी देखील अनेकवेळा नानाला तिच्या घरातून बाहेर पडताना पाहिले होते. अग्निसाक्षीनंतर त्या दोघांनी खामोशी या चित्रपटात देखील एकत्र काम केले. पण या चित्रपटात मनिषा नानाच्या मुलीच्या भूमिकेत झळकली होती. नाना आणि मनिषा यांच्यात सगळे काही सुरळीत आहे असे सगळ्यांना वाटत असतानाच त्यांच्यात भांडणे होत असल्याच्या बातम्या मीडियात ऐकायला मिळायला लागल्या. त्या दोघांचाही स्वभाव रागीट असल्याने अनेकवेळा त्यांच्यात वाद होत होते. एवढेच नव्हे तर नाना मनिषाच्या बाबतीत खूप पझेसिव्ह होत असल्याने तिने तंग कपडे घालणे अथवा इतर नायकांसोबत इंटिमेट सीन देणे त्याला पसंत पडत नव्हते. युगपुरुष या चित्रपटातील मनिषाच्या एका कपड्यावरून तर त्यांच्यात खूपच भांडणे झाली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी एकमेकांशी बोलणे देखील बंद केले होते असे म्हटले जाते. नाना आणि मनिषा यांच्या नात्यात सतत वाद होत असूनही मनिषा नानाला सोडायला तयार नव्हती. पण एकेदिवशी तिने पाहिलेल्या एका गोष्टीमुळे तिला चांगलाच धक्का बसला. तिने नाना आणि आयषा जुल्काला एका खोलीत एकत्र पाहिले होते. त्यावरून ती आयशाशी प्रचंड भांडली होती. पण त्यावेळी नानाने मनिषाला आयशा आणि त्याच्यात काहीही नसल्याचे पटवून दिले होते. मनिषाने देखील नानाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. पण नानाने पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करावे असे मनिषाचे म्हणणे होते. तिला दुसरी बाई म्हणून नानाच्या आयुष्यात राहायचे नव्हते. पण या गोष्टीसाठी नाना तयार नव्हता. त्यामुळे नाना आणि मनिषाने ब्रेकअप केले. मनिषासोबतच्या ब्रेकअपनंतर आयशासोबत नाना लिव्ह इन मध्ये राहू लागला. नानाने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत तो मनिषाला खूप मिस करतो असे त्याने म्हटले होते. त्याने मुलाखतीत सांगितले होते की, ती खूपच सेनसेटिव्ह अभिनेत्री आहे. ती जशी आहे तशी अगदी उत्तम आहे, तिला बदलण्याची गरज नाहीये. तिने आज तिच्यासोबत जे काही केले त्याचा विचार जरी केला तरी मला अश्रू आवरत नाही. खरे तर तिच्याबद्दल काहीही बोलण्याचा मला अधिकार नाहीये. ब्रेकअप झाले तो काळ माझ्यासाठी अतिशय कठीण होता. मला झालेले दुःख मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मी मनिषाला मिस करतो, आपण याबद्दल न बोललेलेच बरे आहे असे मला वाटते. Also Read : तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर लावला होता छेडछाडीचा आरोप; गुन्हा दाखल!