Join us

या भीतीपोटी बेबोने अजय देवगणला किस करण्यास दिला होता नकार, 7 वर्षांनंतर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 18:27 IST

2013 साली या जोडीने ‘सत्याग्रह’ या सिनेमात एकत्र काम केले होते. या चित्रपटात अजय व करिनावर एक लिप-लॉक सीन चित्रीत केला जाणार होता. मात्र...

ठळक मुद्दे ‘सिंघम 2’मध्ये अजयसोबत काम करताना करिनाला प्रचंड त्रास गेला होता

अजय देवगणकरिना कपूर अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. यात ओंकारा, सत्याग्रह, गोलमाल सीरिज सारखे अनेक हिट सिनेमे सामील आहेत. अजय व करिनाची जोडी पे्रक्षकांनीही डोक्यावर घेतली. तूर्तास अजय व करिना त्यांच्या 7 वर्षे जुन्या सिनेमामुळे चर्चेत आहेत. 2013 साली या जोडीने ‘सत्याग्रह’ या सिनेमात एकत्र काम केले होते. या चित्रपटात अजय व करिनावर एक लिप-लॉक सीन चित्रीत केला जाणार होता. मात्र अजयसोबत लिप लॉक सीन देण्यास करिनाने स्पष्ट नकार दिला होता. या नकारामागच्या कारणांचा खुलासा तब्बल  7 वर्षांनंतर झाला आहे.

तर या नकारामागचे कारण होते सैफसोबतचे तिचे लग्न. 2012 मध्ये सैफ व करिना लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या आधीच करिना प्रकाश झा यांच्या या सिनेमासाठी शूटींग करत होती. सैफसोबत लग्न होणार असताना कोणत्याही हिरोसोबत असा सीन देणे करिनाला योग्य वाटले नाही. याच भीतीपोटी तिने प्रकाश झा यांना या सीनसाठी नकार दिला होता. एकंदर सैफमुळे करिनाने अजयला किस करण्यास नकार दिला होता.

लग्नाआधी करिनाने अनेक हिरोंसोंबत बिनधास्त किसींग सीन्स दिले होते. ‘जब वी मेट’ या सिनेमात शाहिद कपूरसोबत तिने दिलेल्या सीनची प्रचंड चर्चा झाली होती. ‘कमबख्त इश्क’ या सिनेमात तर करिनाने अक्षय कुमारसोबत 10 वेळा लिप लॉक सीन दिला होता. करिना कपूर लवकरच दुस-यांदा आई होणार आहे. करिनाने स्वत: चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केली होती.

अजयबद्दल केली होती तक्रारतसे अजय देवगणसोबत काम करताना करिना कपूरला पूर्वापार तक्रारी राहिल्या आहेत. ‘सिंघम 2’मध्ये अजयसोबत काम करताना करिनाला प्रचंड त्रास गेला होता. अजय प्रचंड धुम्रपान करतो. त्याच्यासोबत बसणेही अवघड होते, अशी तक्रार त्यावेळी बेबोने केली होती.

टॅग्स :करिना कपूरअजय देवगण