करण जोहर रणबीर कपूरवर संतापतो तेव्हा...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 15:02 IST
करण जोहर सध्या एक रेडिओ शो होस्ट करतो आहे. या ‘लव्ह गुरु’ शोमध्ये करण आपल्या श्रोत्यांचे लव्ह प्रॉब्लेम सोडवताना ...
करण जोहर रणबीर कपूरवर संतापतो तेव्हा...!!
करण जोहर सध्या एक रेडिओ शो होस्ट करतो आहे. या ‘लव्ह गुरु’ शोमध्ये करण आपल्या श्रोत्यांचे लव्ह प्रॉब्लेम सोडवताना दिसतोय. अलीकडे या शोवर एका श्रोत्याशी बोलताना करणने रणबीर कपूरबद्दल एक धक्कादायक खुलासा केला. होय, रणबीर कुठल्याही मर्यादा न मानणारा कलाकार आहे, असे करणने सांगितले. करण व रणबीरने ‘बॉम्बे वेल्वेट’ व ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटांत सोबत काम केले आहे. रणबीर व करण दोघेही चांगले मित्र आहेत. पण एकदा करण रणबीरवर इतका संतापला की, त्याने रणबीरला चांगलेच फटकारले. अर्थात करणच्या इतक्या संतापण्यामागे कारणही तसेच होते. श्रोत्याशी बोलताना करणने हा सगळा किस्सा ऐकवला. दुसºयाच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची एक मर्यादा असते आणि ती पार करता कामा नये, असे करण एका श्रोत्याला सल्ला देताना म्हणाला आणि हे सांगताना त्याने रणबीरचे उदाहरण दिले. रणबीर कपूर बॉलिवूडचा एक असा अभिनेता आहे, जो अशा प्रकारची कुठलीही मर्यादा पाळत नाही,असे करण म्हणाला. याबद्दलचा किस्साही त्याने शेअर केला. रणबीर एकदा मला माझा मोबाईल चेक करताना दिसला. हे पाहून मी प्रचंड संतापलो होतो. मी लगेच माझ्या मोबाईलचा पासवर्ड बदलला. पण इतके करूनही रणबीरने माझ्या फोनचा लॉक उघडलाच. कदाचित तो माझ्या फोनच्या कंपनीत काम करतो, असे करणने सांगितले. अर्थात रणबीरचा हा किस्सा केवळ गमतीखातर होता. प्रत्येक नात्याला आपली एक मर्यादा माहित असावी, केवळ एवढेच करणला यानिमित्ताने सांगायचे होते.ALSO READ : ‘आयटम नंबर्स’साठी करण जोहरने मागितली माफी! बातमी वाचून होऊ शकते काहींची निराशा!!करण व रणबीर लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये सोबत दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट्ट स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर लीड रोलमध्ये आहे. हा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.