Join us
Daily Top 2Weekly Top 5

फिटनेस फ्रिक जॉन अब्राहमने हॉटेलमध्ये एकाचवेळी खाल्ल्या होत्या 64 पोळ्या, वेटर म्हणाला-अजून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 16:36 IST

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम फिटनेसच्या बाबतीत तो जराही तडतोड करत नाही, पण..

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हा बॉलिवूडच्या सर्वाधिक फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. फिटनेसच्या बाबतीत तो जराही तडतोड करत नाही. पण आधी असं नव्हतं. होय, आधी जॉनला खाण्यापिण्याची प्रचंड आवड होती. एकदा काय तर या पठ्ठ्यानं रेस्टॉरंटमध्ये 64 चपात्या खाल्ल्या होत्या. जॉनने ‘द कपिल शर्मा शो’ शोमध्ये हा खुलासा केला होता.

 जॉन कपिल शर्माच्या शोमध्ये त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. त्याच्यासोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने ही हजेरी लावली होती. जॉन व रकुल यांनी शोमध्ये धम्माल मज्जा केली. याचवेळी जॉनने 64 चपात्यांचा किस्साही सांगितला. तू एकदा रेस्टॉरंटमध्ये ६४ चपात्या खाल्ल्या होत्या ही अफवा खरी आहे का? असं कपिलने जॉनला विचारलं.

यावर हो, हो, हे खरं आहे आणि मी एकाचवेळी 64 चपात्या खाल्ल्या होत्या आणि हे पाहून वेटर हैराण झाला होता. अजून भात सुद्धा आहे, असं वेटर मला म्हणाला होता. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. जॉन फिटनेससाठी स्ट्रीक डाएट फॉलो करतो. काजू कतली ही मिठाई जॉनला प्रचंड आवडते. पण गेल्या 27 वर्षांपासून जॉनने काजू कतली खाल्लेली नाही.

वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर जॉन शेवटचा 'पठाण' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात तो ग्रे शेडच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणही दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन केले. लवकरच तो अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :जॉन अब्राहम