Join us

जेव्हा हर्षाली कॅटला म्हणते,‘आँटी?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 10:24 IST

 हर्षाली मल्होत्रा ही ‘बजरंगी भाईजान’ मुळे चर्चेत आली. सलमान खान आणि कॅटरिना कैफने केलेल्या प्रेमामुळे तिची एक वेगळी ओळख ...

 हर्षाली मल्होत्रा ही ‘बजरंगी भाईजान’ मुळे चर्चेत आली. सलमान खान आणि कॅटरिना कैफने केलेल्या प्रेमामुळे तिची एक वेगळी ओळख ‘बी’ टाऊन मध्ये निर्माण झाली. कॅटरिना आणि हर्षाली यांच्यातही एक नाते निर्माण झाले.नुकतेच कॅटरिनाच्या वाढदिवसानिमित्त हर्षालीने तिला सोशल साईट्सवर शुभेच्छा दिल्या. यात तिने पोस्ट करताना कॅटरिनाला ‘आँटी’ असे म्हटले. तेव्हा कॅटरिनाला वाटले की, हर्षाली तिला ‘दीदी ’ देखील म्हणू शकली असती.पण जेव्हा कॅटला हे लक्षात आले तेव्हा तिने हर्षालीचे आभारच मानले. कॅ टरीना ही सध्या ‘बार बार देखो’ चित्रपटाच्या रिलीजसाठी वाट पाहते आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.