Join us

​‘जब हॅरी मेट सेजल’चा पहिला मिनी ट्रेलर आला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2017 15:33 IST

शाहरूख खान व अनुष्का शर्मा या दोघांचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट येतोय, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सांगण्यासारखी गोष्ट सध्या आहे ती म्हणजे, या चित्रपटाचा मिनी ट्रेलर रिलीज झाला आहे.

शाहरूख खान व अनुष्का शर्मा या दोघांचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट येतोय, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सांगण्यासारखी गोष्ट सध्या आहे ती म्हणजे, या चित्रपटाचा मिनी ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर बराच विनोदी आहे. यातील अनुष्काचे गुजराती एक्सेंट  धमाकेदार आहे. यात हॅरी बनलेला शाहरूखचा सेजल बनलेल्या अनुष्काशी संवाद पाहायला मिळतो आहे. मी खूप चारित्र्यहिन पुरूष आहे. मी महिलांकडे वाईट नजरेतून बघतो, असे तो म्हणतो. चित्रपटाच्या मेकर्सने  चॅम्पियन ट्राफीच्या फायनला ‘जब हॅरी मेट सेजल’चा मिनी ट्रेलर आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना सुरु होताच ‘जब हॅरी मेट सेजल’चा मिनी ट्रेलर रिलीज करण्यात आला. शाहरूखच्या या चित्रपटाचा ट्रेलर तुकड्या तुकड्यात रिलीज होणार आहे. याला मिनी ट्रेलरचे नाव देण्यात आले आहे. आज रिलीज झालेला पहिला मिनी ट्रेलर ३० सेकंदाचा आहे. भारत-पाक क्रिकेट सामन्यादरम्यान मध्ये मध्ये हा ट्रेलर दाखवला जात आहे. या चित्रपटात शाहरूख खान एक पंजाबी गाईड बनलेला आहे. हरविंदर सिंह नेहरा नावाचे पात्र त्याने रंगवले आहे. अर्थात सगळेच त्याला हॅरी म्हणूनच ओळतात. अनुष्काने यात एका बबली गुजराती मुलीची भूमिका साकारली आहे. सेजल युरोप ट्रिप जाते आणि तिला हॅरी भेटतो. मग दोघेही प्रेमात पडतात, अशी याची कथा आहे. यापूर्वी शाहरूख व अनुष्का हे दोघे ‘रब ने बना दी जोडी’ व ‘जब तक है जान’ या चित्रपटात एकत्र दिसले होते.