Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा एका मुलाने शाहरूख खानला विचारले ‘सलमान तुझा भाऊ आहे ना?’ तेव्हा शाहरूखने हे उत्तर दिले!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2017 19:10 IST

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान आणि किंग शाहरूख खान यांच्यातील मैत्री आणि दुश्मनी कधीच लपून राहिली नाही. एक काळ ...

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान आणि किंग शाहरूख खान यांच्यातील मैत्री आणि दुश्मनी कधीच लपून राहिली नाही. एक काळ असा होता की, यांच्यातील दुश्मनी सर्वश्रृत होती. एकमेकांचे तोंडही बघायचे नाही, असा त्यांचा पवित्रा होता. परंतु हळूहळू त्यांच्यात मैत्री फुलू लागली. आता तर दोघेही पक्के मित्र झाले असून, पुन्हा दुश्मनी नको असा जणू काही त्यांनी विचारच केला आहे. कालच सलमान खानने खुलासा केला होता की, त्याने शाहरूख खानसोबतचा बºयाच वर्षांपूर्वीचा एक फोटो जपून ठेवला आहे, तर शाहरूखनेही सलमानविषयी असाच एक धक्कादायक खुलासा केला असून, ते ऐकून तुमचा आनंद गगनात मावणार नाही. त्याचे झाले असे की, शाहरूख एका ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी गेला असता, एका मुलाने त्याला ‘सलमान तुझा भाऊ आहे ना?’ असे विचारले होते. शाहरूखने या प्रश्नाचे जे उत्तर दिले ते ऐकून तुम्हालाच नव्हे तर दस्तुरखुद्द सलमान खानलाही आश्चर्य वाटेल. शाहरूखने त्या चिमुकल्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, ‘सलमान माझा भाऊच नव्हे तर त्यापेक्षाही तो माझ्यासाठी मोठा आहे.’ शाहरूखचे हे उत्तर खरोखरच कौतुकास्पद असून, त्यांच्या नात्यात आणखी गोडवा आणणारे आहे. वास्तविक बॉलिवूडच्या या दोन्ही स्टार्सनी एकत्र राहावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असली तरी, हे दोघे आता पुन्हा कधी एकमेकांचे दुश्मन होणार नाहीत, हेही तेवढेच खरे आहे. सध्या दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटात व्यस्त असून, सलमानच्या ‘ट्यूबलाइट’मध्ये शाहरूख खान कॅमियो करताना बघावयास मिळणार आहे. चित्रपटाच्या टीजर आणि ट्रेलरमध्येच शाहरूखची झलक दाखविण्यात आली होती. हा चित्रपट ईदला रिलीज केला जाणार असून, यामध्ये सलमानचा ‘ट्यूबलाइट’ अवतार बघण्यासारखा असेल. चित्रपटात चिनी अभिनेत्री झू झू, सोहेल खान आणि दिवंगत अभिनेता ओमपुरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.