Join us

बॉलिवूडमधील या अभिनेत्याला आला होता फेशिअल पॅरेलिसिसचा अटॅक, अशा परिस्थितीतही केले होते शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 17:10 IST

कलाकार दिवस रात्र तहान भूक सगळे विसरून काम करीत असतात. बऱ्याचदा आपल्याला त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा पहायला मिळते.

कलाकार दिवस रात्र तहान भूक सगळे विसरून काम करीत असतात. बऱ्याचदा आपल्याला त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा पहायला मिळते. पण बॉलिवूडचे अभिनेते अनुपम खेर यांचा हा किस्सा ऐकल्यानंतर तुम्हाला खरेच त्यांची कमाल वाटेल. 'हम आपके है कौन' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अनुपम खेर यांच्या चेहऱ्याच्या उजव्या भागावर लकव्याचा अटॅक आला होता आणि तरीदेखील त्यांनी घरी न थांबून चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.

न्यूज१८ इंडियाच्या रिपोर्टनुसार अनुपम खेर यांनी आपल्या अनुभवाबद्दल सांगितले. 'हम आपके है कौन' सिनेमात त्यांनी माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे यांच्या पित्याची भूमिका साकारत होते. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानच त्यांना आपल्या या आजाराबद्दल कळले.

याबद्दल बोलताना अनुपम खेर म्हणाले की, ‘एक दिवस मी अनिल कपूरच्या घरी जेवत होतो तेव्हा अनिलच्या पत्नीने माझ्या उजव्या डोळ्याची पापणी खूप वेळ झाली हलत नसल्याचे पाहिले. त्यांनी मला याबद्दल विचारले. पण मी थकल्यामुळे कदाचित असे होत असावे असे मला सुरुवातीला वाटले. दुसऱ्या दिवशी ब्रश करताना मला जाणवले की तोंडातून आपोआप पाणी बाहेर पडत आहे आणि चेहराही थोडा वाकडा होत चालला आहे. त्यावेळी माझ्या बाजूला यश चोप्रा राहायचे. मी थेट त्यांचे घर गाठले. मी त्यांना विचारले की माझा चेहरा वाकडा झाल्यासारखा वाटतोय का?’यश चोप्रा यांना मला झालेल्या आजाराची कल्पना आली आणि त्यांनी मला मुंबईतील प्रसिद्ध न्यूरो डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी मला फेशिअल पॅरालिसिसचा अटॅक आल्याचे सांगितले.

साधारणपणे दोन महिने मी काम करू शकत नाही असेही त्यांनी सांगितले होते. त्याच वेळी मी ‘हम आपके है कौन’चे शूटिंग करत होतो आणि ‘माई नी माई मुंडेर पे तेरी’ गाण्याच्या अगोदरच्या गेमचे चित्रीकरण बाकी होते. चित्रपटाची संपूर्ण टीम सेटवरच होती. 

अनुपम खेर यांनी निर्मात्यांना ही गोश्ट सांगण्याचा विचार केला. पण त्यांना असे वाटले की जर आज असाच घरी गेलो तर जीवनात पुन्हा असे संकट आले असते तर ते तसेच निघून जातील, या विचारांनी त्यांनी घरी न जाता शूटवर जाण्याचा निर्णय घेतला.

खरेच अनुपम खेर यांचे या निर्णयासाठी कौतूक करावे तेवढे कमीच आहे.

टॅग्स :अनुपम खेरहम आपके हैं कौन