Join us

जेव्हा अंकिता लोखंडे स्टेजवर बेशुद्ध झाली होती, तेव्हा पाहा काय झाली होती सुशांत सिंग राजपूतची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 18:18 IST

सुशांत आणि अंकिताच्या जोडीला चाहत्यांना खूप आवडायची.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याच्याशी संबंधीत अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. आता जो व्हिडीओ समोर आला आहे त्यात सुशांत आणि अंकिता  परफॉर्मन्सची झलक दिसतेय. मात्र सोनावरील शो 'झलक दिखला जा' मध्येपरफॉर्मन्स दरम्यान अचानक अंकिताला स्टेजवर चक्कर येते. ती स्टेजवरच बसते. 

अंकिताला असे पाहून इतर स्पर्धकांसोबत बसलेला सुशांत खूप अस्वस्थ होतो. तो खूप टेन्शनमध्ये दिसतो.  यानंतर जेव्हा अंकिता उभी राहते आणि ती ठीक असल्याचे सांगते तेव्हा सुशांत नॉर्मल होतो. सुशांत आणि अंकिताच्या जोडीला चाहत्यांना खूप आवडायची. आजही फॅन्स दोघांच्या जोडीचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. 

सुशांतच्या निधनामुळे अंकिता लोखंडे अजूनही दु:खात आहे. सुशांतच्या निधनानंतर अंंकिता सोशल मीडियापासून लांब झाली आहे. सुशांतचे अंकितावर खूप प्रेम होते.  सुशांत आणि अंकिताची लव्हस्टोर पवित्रा रिश्ताच्या सेटवर सुरु झाली होती. सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर दोघांच्या नात्यामध्ये हळूहळू दुरावा याला लागला. ब्रेकअप नंतर अंकिता आतून तुटली होती. काहीकाळ तिने काम करणही बंद केले होते. तिला यातून बाहेर यायला बराच कालावधी लागला होता. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअंकिता लोखंडे