Join us

जेव्हा ऐश्वर्यासाठी अभिषेक झाला डॉक्टर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 19:30 IST

सेटवरील एक फोटो अभिषेक बच्चनने सोशल मीडिया नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तो ऐश्वर्याचे ब्लडप्रेशर चेक करताना दिसत आहे.

बॉलिवूडमधील सर्वांत क्युट कपलमध्ये समाविष्ट असलेले अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांचे एकमेकांवरील प्रेम सर्वश्रृत आहेच. काही दिवसांपूर्वी अभिषेकने ऐश्वर्याला कसे प्रपोज केले याबद्दलचे ट्विट केले होते. दोघांनी एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाची कबुली दिल्यावर रितसर विवाह केला होता. दोघांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. अभिषेक आपली पत्नी ऐश्वर्याची किती काळजी घेतो हे त्याने एका फोटोच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. लग्नानंतरही मनीरत्नमच्या रावन या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर चालला नसला तरी दोघांच्या अभिनयाची प्रशंसा झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो अभिषेक बच्चनने सोशल मीडिया नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तो ऐश्वर्याचे ब्लडप्रेशर चेक करताना दिसत आहे. या फोटोमागील रहस्य असे की, रावनच्या सेटवर अचानक ऐश्वर्याची तब्येत बिघडली. तिच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने अभिषेकने स्वत: आपल्या हाती स्टेस्थेस्कोप घेऊन तिचे ब्लडप्रेशर चेक करीत आहे. यावरून अभिषेक आपल्या बायकोची किती काळजी घेतो याची जाणीव होते. मागील काही दिवसांपासून अभिषेक बच्चन सोशल मीडियावर चांगलाच अ‍ॅक्टिव्ह झाला असून आपल्या जीवनाबद्दलचे खुलासे तो करतान दिसतो आहे. अभिषेक बच्चन मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या साजिद खानच्या ‘हाऊसफुल्ल 3’ या चित्रपटात दिसला होता. दुसरीकडे ऐश्वर्या राय हिने मागील वर्षी रिलीज झालेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात भूमिका केली होती. या चित्रपटात तिने रणबीरसोबत बोल्ड सिन्स दिले होते यामुळे बच्चन कुटुंबीय नाराज झाले होते असे सांगण्यात येते. मागील वर्षी रिलीज झालेल्या अभिषेक व ऐश्वर्याच्या चित्रपटाने १०० कोटींची कमाई के ली होती. संपूर्ण बच्चन कुटुंबीय एकाच चित्रपटा यावे अशी इच्छा काही दिवसांपूर्वी खुद्द अभिषेकने व्यक्त केली होती. आता त्याची इच्छा कधी पूर्ण होते हे येणारा काळच ठरवेल.  ">http://