Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा जया बच्चन यांची साडी नेसून कार्यक्रमात आली ऐश्वर्या राय बच्चन.. जाणून घ्या कसे आहे सासू-सुनेचे नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 13:52 IST

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर रसिकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. अभिषेक बच्चनसोबत ...

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर रसिकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. अभिषेक बच्चनसोबत लग्न झाल्यानंतर नेहमीच ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्याबाबत अनेक चर्चा होतात. ऐश्वर्याचे सासूबाई जया बच्चन यांच्यासोबत पटत नाही दोघींमध्ये खटके उडत असल्याच्या चर्चा नेहमीच होत असतात. मात्र आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते जरा वेगळे आहे. 2010 मध्ये स्क्रिन अॅवॉर्डला जया बच्चन यांना लाल रंगाची साडी नेसून आल्या होत्या. या साडीने सगळ्यांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. यानंतर एक वर्षांनी दुर्गा पूजेच्या वेळी ऐश्वर्या राय याच साडीमध्ये दिसली होती. यानंतर तब्बल तीन वर्षांनी 2014ला स्टारडस्टच्या एक कार्यक्रमात ऐश्वर्या पुन्हा एकदा त्याच साडीत दिसली.    गेल्या वर्षी अभिषेक बच्चनने स्टारडस्ट अॅवॉर्डचे अँकरिंग केले होते. अॅवॉर्ड शो दरम्यान बेस्ट एक्ट्रेसच्या कॅटगरीत अभिषेकने ऐश्वर्याचे नावा सुद्धा जाहिर केले होते. सरबजीतच्या बहिणीच्या भूमिकेसाठी तिला नामाकांन मिळाले होते. चित्रपट बॉक्स ऑफिसवर काहीच कमाल दाखवू शकला नव्हता मात्र यातील ऐश्वर्याच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.कॉफी विद करण या शोमध्ये जया बच्चन यांनी ऐश्वर्याचे खूप कौतुक केले होते. आराध्य बच्चन खूप लकी आहे कारण तिला ऐश्वर्यासारखी आई मिळाली आहे. ऐश्वर्या खूप समजुतदार आहे. तिला मुलांचे पालन पोषण कसे करायचे हे नीट माहिती आहे, असे जया बच्चन म्हणाल्या होत्या. लग्न झाल्यापासून नेहमीच ऐश्वर्या आणि जया बच्चन यांचे नाते लोकांच्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनले आहे. ALSO READ :  ऐश्वर्या राय बच्चनने गुपचूप आॅर्डर केले ‘स्लिमींग आॅईल’ !!लवकरच अभिषेक आणि ऐश्वर्याची जोडी अभिमानच्या रिमेकमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा जोडीचा अभिमानचा सिक्वल तयार करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 1973 साली अभिमान हा चित्रपट हिट झाला होता. तामिळ छायाचित्रकार-दिग्दर्शक राजीव मेनन यांनी या चित्रपटाचा रिमेक बनवण्याची तयारी दर्शवली आहे.