Join us
Daily Top 2Weekly Top 5

अन् माधुरी दीक्षित रागाने लालबुंद झाली, आमिरच्या मागे हॉकी स्टिक घेऊन मारायला धावली...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 17:24 IST

अलीकडे स्वत:च माधुरीने हा किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला होता. किस्सा आहे 1990 सालचा.

ठळक मुद्दे माधुरीसोबतच नाही तर जुही चावलासोबतही आमिरने हेच केले होते. ‘इश्क’च्या सेटवर आमिर अनेकदा जुहीची मजा घेत, तिच्यासोबत प्रँक करायचा.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमीर खान व ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित या जोडीची पडद्यावरची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. अर्थात तरीही ही जोडी फार सिनेमात दिसली नाही. कारण काय माहित नाही. पण हो, आमीरने सेटवर एकदा असे काही केले होते की, माधुरी ते कधीही ते विसरू शकत नाही.

अलीकडे स्वत:च माधुरीने हा किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला होता. तर हा किस्सा आहे 1990 सालचा. इंद्र कुमार यांच्या ‘दिल’ या सिनेमाच्या सेटवरचा. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान आमीरने असे काही केले की, माधुरी रागाने लालबुंद झाली होती. इतकी की, हॉकी स्टिक घेऊन ती आमिरला मारायला धावली होती.

 तर ‘दिल’ सिनेमातील ‘खंबे जैसी खडी है... ’या गाण्याचे शूटिंग चालू होते. त्यावेळी आमीरच्या डोक्यात माधुरीची थट्टा करण्याची कल्पना सुचली. मी लोकांचे हात पाहून भविष्य सांगतो, असे काय काय आमीरने माधुरीच्या डोक्यात भरवले. आता भविष्य  जाणून घ्यायला कोणाला आवडणार नाही. आमीर भविष्य सांगतो हे ऐकताच माधुरी उत्तेजित झाली.  तिने लगेच आमीरसमोर आपला हात पुढे केला. घे, सांग माझे भविष्य, असे म्हणत आता आमीर आता काय सांगणार, याची ती प्रतीक्षा करू लागली. आमीरने आधी तिचा हात नीट पारखून पाहिला आणि नंतर काय तर माधुरीच्या हातावर पचक्न थुंकला. आमीर असे काही करेल, याची माधुरीने कल्पनाही केली नव्हती. आमीर खिदळत होता आणि माधुरीचा पारा जाम चढला होता. ती रागाने लाल झाली आणि चक्क हॉकी स्टिक घेऊन त्याला मारायला धावली.

 माधुरीसोबतच नाही तर जुही चावलासोबतही आमिरने हेच केले होते. ‘इश्क’च्या सेटवर आमिर अनेकदा जुहीची मजा घेत, तिच्यासोबत प्रँक करायचा. आमिरला ही सवयचं होती. आपल्या सहकलाकारांची फजिती करताना त्याला मज्जा यायची. एकदा जुहीनेही जसा हात पुढे केला तसा आमिर तिच्या हातावर थुंकला होता. या प्रकारानंतर जुही इतकी खवळली की, तिने आमिरशी बोलणे बंद केले होते. अनेकवर्ष दोघांमध्ये अबोला होता.

टॅग्स :माधुरी दिक्षितआमिर खान