Join us

​कॅट चिल्ड विद हू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 17:38 IST

रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळेच अधिक चर्चेत राहिलेली कॅटरिना कैफ बॉलिवूडमधून जणू दिसेनासी झाली होती. ब्रेकमुळे चर्चा ठीक पण कामाचे काय, ...

रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळेच अधिक चर्चेत राहिलेली कॅटरिना कैफ बॉलिवूडमधून जणू दिसेनासी झाली होती. ब्रेकमुळे चर्चा ठीक पण कामाचे काय, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण कॅटरिना अजूनही बाद झालेली नाहीय. सध्या ती बिझी आहे, ती ‘बार बार देखो’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा कॅटरिनाच्या अपोझिट आहे. आता शूटींग  जवळ जवळ अखेरच्या टप्प्यात आहे म्हटल्यावर  प्रमोशनचे काय ते, बघावे लागेलच..म्हणूनच की, काय, कॅटरिनाने आता चर्चेत राहायचे ठरवलेयं. आता चर्चेत राहायचे तर उपद्व्याप आलेच.(???) सध्या थायलंडमध्ये  कॅटरिनाचे शूट सुरु आहे. आपल्या टीमसोबत कॅटरिना सध्या याठिकाणी धम्माल मस्ती करतेयं. सेटवर धम्माल मस्ती करण्याच्या मूडमधील कैफसोबतचा एक सेल्फि यानिमित्ताने सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कॅटरिनाचा ट्रेनर रझा याने कॅटरिना व चित्रपटाची डायरेक्टर नित्या मेहरा अशा तिघांची एक सेल्फी पोस्ट केली आहे.बघा तर!!!