ढिशूममधील गाण्यादरम्यान ‘किस’ची आयडिया वरुणची
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 19:14 IST
अभिनेत्री परिणीती चोप्राच्या अनुसार जानेमन आह या ढिशूम चित्रपटातील गाण्यादरम्यान किसची आयडिया ही वरुण धवनची होती.या गाण्याच्या शेवटी ...
ढिशूममधील गाण्यादरम्यान ‘किस’ची आयडिया वरुणची
अभिनेत्री परिणीती चोप्राच्या अनुसार जानेमन आह या ढिशूम चित्रपटातील गाण्यादरम्यान किसची आयडिया ही वरुण धवनची होती.या गाण्याच्या शेवटी चुंबनाचे दृष्य असावे अशी वरुणची इच्छा होती. शुटींगच्या दिवशी रोहित धवन त्यावेळी उपस्थित नव्हता. नृत्यदिग्दर्शक अहमद खान वगळता हे कोणालाही माहिती नव्हते. ज्यावेळी वरुणने चुंबन घेतले, त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला, असे परिणीता म्हणाली.२७ वर्षीय परिणीताने वरुणचे कौतुक केले. तो अत्यंत उत्साहवर्धक आहे. त्याच्यामध्ये खूप सातत्य असल्याचे तिने सांगितले. नव्वदीच्या दशकात गोविंदा आणि करिष्मा कपूर यांच्या गाण्याचा फिल यावा अशा पद्धतीने हे गाणे तयार करण्यात आले आहे. आम्ही त्या गाण्यास छान पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही दोघे यासाठी परफेक्ट होतो, असे वरुण म्हणाला. परिणीतीसाठी हा पहिले खास गाणे असल्याचेही त्याने सांगितले.