Join us

​कॅट-आदित्यमध्ये चालले तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 10:45 IST

रणबीर कपूरसोबत ब्रेक अप झाल्यापासून कॅटरीना मीडियापासून जरा लांबच राहत आहे. रणबीरविषयी विचारल्या जाणाºया प्रश्नांनी ती पुरती हैराण झाली ...

रणबीर कपूरसोबत ब्रेक अप झाल्यापासून कॅटरीना मीडियापासून जरा लांबच राहत आहे. रणबीरविषयी विचारल्या जाणाºया प्रश्नांनी ती पुरती हैराण झाली आहे.पे्रमभंगाचे दु:ख विसरण्यासाठी ती आता पार्टीज् आणि सुट्यांमध्ये आपला वेळ दडवत आहे.नुकतीच ती तिची जवळची मैत्रीण आणि फिल्म निर्माती आरती शेट्टीच्या घरी पार्टीमध्ये दिसली. यावेळी तिची कंपनी म्हणून कोण होता माहितीए?संपूर्ण पार्टीमध्ये तिला साथ देत होता तो ‘फितूर’ को-स्टार आदित्य रॉय कपूर. यावेळी पार्टीमध्ये आलिया भट आणि इतर बी-टाऊन स्टार्सदेखील होते. परंतु कॅट आणि आदित्य ऐकमेकांशीच बोलण्यात व्यस्त होते.आता आदित्य मित्र म्हणून कॅटच्या सोबत होता की, कारण काही तरी दुसरेच आहे?लवकरच कॅट अमेरिकेत होणाºया ‘ड्रीम टूर’साठी रवाना होणार आहे. सध्या तिच्याकडे दोन फिल्म्स असून लवकरच ती नवीन प्रोजेक्ट हाती घेणार आहे.