Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पुल्कित हे काय??

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 17:09 IST

पुल्कित सम्राट सध्या चुकीच्या कारणांमुळेच अधिक चर्चेत आहे. सर्वात आधी पत्नी श्वेता रोहिरासोबत विभक्त होण्याच्या निर्णयामुळे पुल्कित चर्चेत आला. ...

पुल्कित सम्राट सध्या चुकीच्या कारणांमुळेच अधिक चर्चेत आहे. सर्वात आधी पत्नी श्वेता रोहिरासोबत विभक्त होण्याच्या निर्णयामुळे पुल्कित चर्चेत आला. याचदरम्यान यामी गौतम या अभिनेत्रीसोबतच्या कथित प्रेमसंबंधावरून पुल्कितची चर्चा झाली. हे ‘प्रेम’प्रकरण इतके विकोपाला गेले की, श्वेताने यामीला चक्क ‘संसार तोडणारी’ म्हटले. यानंतर पुल्कित पुन्हा चर्चेत आला तो,‘जुनूनियत’ या त्याच्या चित्रपटाच्या निर्मात्यांसोबतच्या वादामुळे. निर्मात्यांनीच ‘जुनूनियत’ पाडला, असा आरोप पुल्कितने केला. यानंतर मीडियाच्या फोटोग्राफर्सच्या अंगावर धावून गेल्याने पुल्कित वादात सापडला. आता पुन्हा एकदा  काहीसा विचित्र रिअ‍ॅक्ट झाल्यामुळे पुल्कित चर्चेत आलाय. काल-परवा विमानतळावर तो फोटोग्राफर्सला सामोरा गेला. पण फोटोग्राफर्सच्या कॅमेºयांची क्लिक क्लिक सुरु होणार तोच पुल्कित विमानतळाच्या फरशीवर चक्क आडवा झाला. पुल्कित असे फरशीवर झोपणे सगळ्यांनाच विचित्र वाटले. पुल्कितला झाले तरी काय, हा प्रश्न मग सगळ्यांनाच पडला.