Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय?? विद्युत जामवालला व्हायचेयं Nude?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 17:05 IST

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या अ‍ॅक्शन सीन्समुळे चर्चेत आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताहात. विद्युत सध्या चर्चेत ...

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या अ‍ॅक्शन सीन्समुळे चर्चेत आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताहात. विद्युत सध्या चर्चेत आहे, ते त्याच्या एका बोल्ड विधानामुळे. होय, विद्युत असा काही बोल्ड बोलला की, त्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. एका मुलाखतीत विद्युतला एक प्रश्न विचारला गेला. हा प्रश्न होता, न्यूडिटी सीनबद्दलचा. भविष्यात एखाद्या चित्रपटात न्यूड सीन करायची वेळ आली तर तू करशील का? असे विद्युतला विचारले गेले. यावर विद्युतने होकारार्थी उत्तर दिले. न्यूड सीन्स देण्यात मला काहीही गैर वाटत नाही. माझे माझ्या शरीरावर प्रेम आहे.  असे सीन्स द्यायची वेळ आली तर कॅमेºयापुढे मी पूर्णपणे कम्फर्टेबल असेल. मला असे सीन्स देण्यात कुठलीही अडचण नाही, असे त्याने सांगितले.एकंदर काय तर विद्युत आता प्रत्येक आव्हानासाठी तयार आहे. अ‍ॅक्शन हिरो म्हणून विद्युतने नवी ओळख तर निर्माण केली आहेच. येत्या काळात एक मुरब्बी अभिनेता अशी आणखी एक विद्युतची ओळख असणार आहे. जॉन अब्राहमसोबत ‘फोर्स2’मध्ये विद्युत दिसला होता. या चित्रपटाने विद्युतच्या रूपात एक नवा अ‍ॅक्शन आयकन बॉलिवूडला दिला. हा अ‍ॅक्शन आयकन  लवकरच ‘कमांडो2’मध्ये  अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. येत्या आठवड्यात हा चित्रपट पे्रक्षकांच्या भेटीस येतो आहे. ‘कमांडो2’ हा सन २०१३ मध्ये आलेल्या ‘कमांडो’ चित्रपटाचा सीक्वल आहे. अलीकडे ‘कमांडो2’चा ट्रेलर आऊट झाला. यात विद्युत जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसला. पहिल्या चित्रपटाच्या तुलनेत देवेन भोजनानी दिग्दर्शित ‘कमांडो2’मध्ये अधिक अ‍ॅक्शन असल्याचा दावा मेकर्सनी केला आहे. विद्युत शिवाय या चित्रपटात अदा शर्मा, फ्रेडी दारूवाला, सुहैल नायर, सेफाली शहा व सतीश कौशिक यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.