कोरोनाची देश व जगभरात अजूनही दहशत कायम आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. कित्येक लोक कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. त्यात भारतात आता लॉकडाउननंतर अनलॉक 2 जाहीर केले आहे. यादरम्यान बॉलिवूडमधील कलाकारांचे बरेच जुने किस्से वाचायला मिळत आहेत. यादरम्यान श्रीदेवी यांच्या सर्जरीचा किस्सा व्हायरल होताना दिसत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवी वयाच्या पन्नाशीत इतकी सुंदर होती त्यामागचे कारण सर्जरी असल्याचे बोलले जात होते. काही रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले जात होते की तिने इतक्या सर्जरी केल्या होत्या, ज्यामुळे तिला इन्फेक्शन झाले आणि तिचा मृत्यू झाला. श्रीदेवीने चिरतरूण दिसण्यासाठी नेहमी सर्जरी करत होत्या. तिने जवळपास 29 प्लास्टिक सर्जरी केल्या होत्या. एक सर्जरी तिने मृत्यूच्या काही दिवस आधी केली होती.
२४ फेब्रुवारी, २०१८ साली श्रीदेवीचे निधन झाले. बोनी कपूर यांच्या भाच्याच्या दुबईला लग्नासाठी गेलेल्या श्रीदेवीचा हॉटेलच्या बाथरुमधील बाथटबमध्ये पडून मृत्यू झाला होता.