Join us

रेखा आणि फरजानाचे नाते काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:17 IST

  रेखा बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. रेखाचे वैयक्तिक आयुष्य देखील वादग्रस्त होते. तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले परंतु ...

 
 रेखा बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. रेखाचे वैयक्तिक आयुष्य देखील वादग्रस्त होते. तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले परंतु प्रत्येक परिस्थितीचा तिने सामना केला. आजही तिच्या आयुष्यातील काही घटना या रहस्यमयच असल्याचे बोलले जाते. रेखाच्या भांगेतील सिंदुर देखील आजपर्यंत चर्चेचा विषय आहे.  १० आॅक्टोबरला अभिनेत्री रेखा ६२ वर्षांची झाली आहे. रेखाबरोबर अनेकदा पार्ट्या, इव्हेंट्स, अवॉर्ड्स शो अगदी संसदेतही एक महिला पाहायला मिळत असते. प्रसिद्ध पत्रकार मोहनदीप यांच्या युरेखा या पुस्तकामध्ये या महिलेबरोबर रेखाचे सेक्श्युअल रिलेशन असल्याचा दावा करण्यात आला आहे. रेखाबरोबर अनेकदा दिसणाºया या महिलेचे नाव फरजाना आहे. फरजाना रेखाची सेक्रेटरी आहे. ती अनेक वर्षांपासुन रेखासोबत सावलीप्रमाणे असते. या दोघींच्या संबंधांबाबत अनेकदा चर्चा होत असते. पुस्तकात सर्वात महत्त्वाचा उल्लेख रेखा आणि फरजाना यांच्या संबंधांबाबत आहे. हे वाचून रेखाच्या चाहत्यांना धक्का बसणार हे नक्की.