Join us

राधिका आपटे लंडनमध्ये सध्या काय करतेय?, पहा तिचा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 17:48 IST

अभिनेत्री राधिका आपटे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. तिचा कधी फोटो तर कधी व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो. राधिका सध्या लंडनमध्ये असून तिने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती काहीतरी काम करताना दिसते आहे.

अभिनेत्री राधिका आपटे हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ लंडनमधील असून ती या व्हिडीओत घरातील वूडन लादी काढताना दिसते आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत सांगितले की फ्रेंड्सच्या नवीन घर रिन्यूएट करते आहे. तिचा हा व्हिडीओ पाच लाखांहून जास्त लोकांनी पाहिला आहे.

राधिका आपटे लॉकडाउनपासून लंडनमध्ये आहे. ती तिथले फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसते. 

राधिका आपटे हिच्या सिनेइंडस्ट्रीतील करियरची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीपासून केली आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे घो मला असला हवा. घो मला असला हवा हा चित्रपट २००९ साली रिलीज झाला. या चित्रपटाची निर्मिती केबीसी प्रोडक्शन्सने केली असून या चित्रपटात राधिकाने गावातील सावित्री या महिलेची भूमिका केली होती.

राधिकाने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी आणि तमीळ चित्रपटात काम केलं आहे. तसेच अनेक वेबसिरिजमध्ये देखील ती झळकली आहे.

राधिका अ कॉल टू स्पाय या इंटरनॅशनल चित्रपटात दिसणार आहे. यात ती नूर इनायत खान नामक हेरची भूमिका यात साकारताना दिसणार आहे. तिच्यासोबत विर्जिना हॉलच्या भूमिकेत सारा मेघन थॉमस दिसणार आहे. नूर व विर्जिनाची निवड वेरा अॅटकिन्स वर्ल्ड वॉर टूच्या मिशनसाठी निवड करतो. या सिनेमाची स्टोरी वर्ल्ड वॉर टूमधील महिला हिरोंची माहित नसलेली स्टोरी दाखवण्यात येणार आहे.

टॅग्स :राधिका आपटे