Join us
Daily Top 2Weekly Top 5

असं काय घडलं होत की, प्रियंका चोप्रानं करण जोहरला दिलं नव्हतं लग्नाचं आमंत्रण, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 20:52 IST

Priyanka Chopra : सध्या प्रियंका चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिची अलीकडेच सिटाडेल ही वेबसिरीज रिलीज झाली आहे. या मालिकेत प्रियांका शानदार अॅक्शन अवतारात दिसत आहे. एकीकडे या सीरिजमुळे प्रियंका चर्चेत आहे तर दुसरीकडे, अभिनेत्री बॉलीवूड इंडस्ट्रीबद्दल सतत आपले वक्तव्य देताना दिसत आहे. दरम्यान, आता देसी गर्लचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये करण जोहरने प्रियांकाला तिच्या लग्नाला आमंत्रित केले नसल्याचे सांगितले आहे.

खरंतर हा व्हिडिओ 'कॉफी विथ करण' या शोचा आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा आणि करीना एकत्र दिसल्या होत्या. लग्नानंतर प्रियंका पहिल्यांदा करण जोहरच्या शोमध्ये पोहोचली होती. या व्हिडिओमध्ये करण पीसीच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारतो आणि उत्तरात प्रियांका म्हणते, "आमचे लग्न खूप मजेशीर होते कारण फक्त माझे आणि त्याचे कुटुंब होते." यानंतर करण जोहरने प्रियांकाला बॉलिवूडमधील कोणालाही आमंत्रित केले नाहीस असे सांगितले. यावर प्रियांका म्हणाली, 'मलाही तुमच्या अनेक फंक्शन्समध्ये बोलावण्यात आले नव्हते' पीसीचे हे उत्तर ऐकून करण जोहरची बोलती बंद झाली.  अलीकडेच प्रियांका चोप्रा एक दिवसासाठी भारतात आली होती. वास्तविक, ती बहीण आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या साखरपुड्यासाठी आली होती.

प्रियांका चोप्रा शेवटची हॉलिवूड फिल्म 'लव्ह अगेन'मध्ये दिसली होती. त्यानंतर ती लवकरच दिग्दर्शक फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट आणि कतरिना कैफ देखील आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्राकरण जोहर