असे काय झाले की प्राचीने ठोकला चित्रपटाला रामराम ??
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 19:28 IST
‘अजहर’च्या रिलीजनंतर लगेच प्राची देसाई एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त झाली होती. हा चित्रपट फुटबॉलवर आधारित होता. पण नव्या माहितीनुसार, ...
असे काय झाले की प्राचीने ठोकला चित्रपटाला रामराम ??
‘अजहर’च्या रिलीजनंतर लगेच प्राची देसाई एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त झाली होती. हा चित्रपट फुटबॉलवर आधारित होता. पण नव्या माहितीनुसार, काही दिवस शूटींग केल्यानंतर प्राचीने या चित्रपटाला रामराम ठोकला. होय, हा चित्रपटच प्राचीने सोडून दिला. यामागचे कारणही समोर आले आहे. प्राचीला म्हणे, वेगळीच स्क्रीप्ट ऐकवली गेली आणि शूटींगवेळी काही वेगळेचे केले जात असल्याचे तिला जाणवले. त्यामुळे प्राचीने हा चित्रपट सोडणे योग्य समजले. एका सूत्राने दिलेल्या माहितीनसार, प्राचीने ‘पेनाल्टी’ नामक चित्रपट साईन केला होता. शूटींग सुरु व्हायच्या काही दिवसांआधी दिग्दर्शक शुभम सिन्हा याने प्राचीला स्क्रिप्ट दिली. शूटींग सुरुही झाली. मात्र स्क्रिप्ट नॅरेशन फारसे आवडले नसल्याचे सांगत प्राचीने डायरेक्टरला चित्रपट करण्यास नकार दिला. मला जसे वाटत होते, तसा हा चित्रपट नाहीय, हे सांगायलाही प्राची घाबरली नाही. सध्या यावर डायरेक्टर वा प्राचीने प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र प्राचीच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.