Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांच्यासाठी विनोद खन्नांनी कुटुंब-इंडस्ट्रीचा केलेला त्याग, त्या ओशोंबद्दल 'धुरंधर' फेम अभिनेत्याला काय वाटतं? म्हणालेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:18 IST

'Dhurandhar' fame actor Akshaye Khanna on Osho's: विनोद खन्ना त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्यांनी सिनेइंडस्ट्री सोडली होती. त्यांनी ओशोंचे अनुसरण केले आणि कुटुंबालाही सोडले होते. याबद्दल त्यांचा मुलगा अभिनेता अक्षय खन्नाने एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते. तसेच, तो स्वतः ओशोंना मानतो की नाही, याचाही त्याने खुलासा केला होता.

बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या आदित्य धर यांच्या 'धुरंधर' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. तसे तर तो स्वतःला लाइमलाइटपासून दूर ठेवतो, पण काही वर्षांपूर्वी त्याने आपले वडील विनोद खन्ना यांनी रजनीशपूरममध्ये घालवलेल्या वेळेबद्दल भाष्य केले होते. ओशोंचे अनुयायी असलेल्या विनोद खन्ना यांनी त्यांचे अनुसरण करण्यासाठी, आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना चित्रपटसृष्टीशी नाते तोडले होते. त्यांनी पत्नी आणि दोन मुलांना भारतात सोडून ओरेगन (अमेरिका) येथे प्रयाण केले होते.

'मिड डे'ला दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय खन्ना म्हणाला होता की, "फक्त कुटुंबालाच सोडले नाही, तर 'संन्यास' घेतला. संन्यासाचा अर्थ आहे आपल्या जीवनाचा पूर्णपणे त्याग करणे, कुटुंब तर फक्त त्याचा एक भाग आहे. हा एक जीवन बदलून टाकणारा निर्णय होता, जो त्यांना त्या वेळी घेणे गरजेचे वाटले. पाच वर्षांचा मुलगा म्हणून, माझ्यासाठी हे समजणे अशक्य होते. आता मला ते समजू शकते."

''काहीतरी असेल, ज्यामुळे ते...''त्यांनी पुढे सांगितले, "नक्कीच काहीतरी असे झाले असेल, ज्यामुळे ते आतून इतके हादरले असतील की त्यांना वाटले असेल, असा निर्णय घेणे त्यांच्यासाठी योग्य आहे. विशेषतः जेव्हा आयुष्यात सर्व काही तुमच्याकडे आहे. असा निर्णय घेण्यासाठी स्वतःच्या आतमध्ये भूकंप येणे आवश्यक असते. पण त्यावर ठाम राहणेही महत्त्वाचे आहे. कोणीही निर्णय घेऊन असं म्हणू शकतो की 'हे मला आवडले नाही, चला परत जाऊया.' पण तसे झाले नाही. अमेरिकेत ओशो आणि वसाहतीची परिस्थिती, अमेरिकेच्या सरकारशी झालेला वाद  हेच कारण होते की ते परत आले."

''ते कधीच परत आले नसते''ते त्यांच्या कुटुंबाकडे परतले की ओशोंच्या शिकवणीवरील त्यांचा विश्वास कमी झाला होता? या प्रश्नाच्या उत्तरात अक्षय म्हणाला, "माझ्या वडिलांच्या आयुष्यातील त्या टप्प्यातील ज्या आठवणी मला आठवतात, मला नाही वाटत की ते कोणतेही कारण होते. कारण फक्त एवढेच होते की कम्यून तुटले होते आणि नष्ट झाले होते. त्यामुळे प्रत्येकाला आपला मार्ग स्वतः शोधावा लागला. म्हणूनच ते परत आले. अन्यथा, मला नाही वाटत की ते कधी परत आले असते."

ओशोंना मानतात अक्षयअक्षयने पुढे सांगितले, "मी ओशोंचे अनेक प्रवचने वाचले आहेत आणि लाखो व्हिडीओ पाहिले आहेत. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. मी संन्यास घेऊ शकेन की नाही, हे मला माहीत नाही. पण याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्या प्रवचनांचा आनंद घेऊ शकत नाही आणि त्यांच्या विचारांचा आदर करू शकत नाही. माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आहे."

अभिनयात केले होते कमबॅकविनोद खन्ना भारतात परतल्यावर त्यांनी पुन्हा चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत त्यांनी अभिनय करणे सुरूच ठेवले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Akshaye Khanna reflects on Vinod Khanna's devotion to Osho.

Web Summary : Akshaye Khanna discussed his father Vinod Khanna's decision to leave Bollywood for Osho, emphasizing the profound internal shift that must have driven it. He respects Osho's teachings despite not being able to embrace renunciation himself.
टॅग्स :अक्षय खन्नाविनोद खन्ना