Join us

सलमानच्या वादावर शाहरुख काय म्हणतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 16:22 IST

बलात्कारित महिलेशी तुलना करताना केलेल्या सलमानच्या वक्तव्यावर बोलण्याइतके आपण पात्र नसल्याचे अभिनेता शाहरुख खानचे म्हणणे आहे.शाहरुख म्हणाला, गेल्या ...

बलात्कारित महिलेशी तुलना करताना केलेल्या सलमानच्या वक्तव्यावर बोलण्याइतके आपण पात्र नसल्याचे अभिनेता शाहरुख खानचे म्हणणे आहे.शाहरुख म्हणाला, गेल्या काही वर्षात असे लक्षात आले आहे की, मी माझ्याबाबतीत अनेक चुकीची वक्तव्ये केली आहेत. कोणाच्यातरी वक्तव्याबाबत दुसºयाने आपले मत मांडावे यासाठी मी बसलेलो नाही. खरं सांगायचे झाले तर मी कोणाचीही बाजू घेत नाहीए.’मी स्वत:बाबत अनेकवेळा बोललो आहे. इतरांबाबतीत निर्णय देणारा मी कोण? वैयक्तिकरित्या सांगायचे, म्हटले तर मी काही बोलू इच्छित नाही. मी देखील चुकीचे बोललो आहे, असे शाहरुखने सांगितले.गतवर्षी शाहरुख खानने असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते.