Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय वाटते प्रियांका चोप्राला ‘सेक्स सिम्बॉल’ म्हटल्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 13:42 IST

आपली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा बॉलीवूड गाजवल्यानंतर आता हॉलीवूडमध्ये तिचा दबादबा निर्माण करून तमाम चाहत्यांची मान अभिमानाने उंचावत आहे. ...

आपली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा बॉलीवूड गाजवल्यानंतर आता हॉलीवूडमध्ये तिचा दबादबा निर्माण करून तमाम चाहत्यांची मान अभिमानाने उंचावत आहे. तिच्या अभिनयाची दखल अमेरिकेच्या समीक्षक आणि प्रेक्षकांनीसुद्धा घेतली आहे. यशाची एक-एक शिखरे गाठणाऱ्या प्रियांकाचा हा प्रवास सोपा नव्हता.मनोरंजनच्या क्षेत्रात महिलांप्रती दृष्टीकोन चांगला असतोच असे नाही. पण लोक काय म्हणतात याला प्रियांका जास्त महत्त्व देत नाही. ती बिनदिक्कतपणे तिचे स्वतंत्र मत मांडते. म्हणून तर तिला एका मुलाखती दरम्यान जेव्हा ‘सेक्स सिम्बॉल’ म्हणून ओळखले जाण्याबद्दल काय वाटते असे विचारले असते ती म्हणाली की, मला काहीच फरक पडत नाही. म्हणजे वाईटही वाटत नाही आणि आनंदही होत नाही. मी अभिनेत्री आहे आणि या क्षेत्रात अशा गोष्टी चालायच्याच. खरे सांगायचे तर इंडस्ट्रीमध्ये एवढी वर्षे काम केल्यानंतर फार कमी गोष्टी आहेत ज्यांना मी घाबरते किंवा मला त्याबद्दल वाईट वाटते.प्रियांका सध्या ‘बेवॉच’ सिनेमासाठी खूप चर्चेत आहे. ड्वेन जॉन्सन (द रॉक) आणि झॅक अ‍ॅफ्रॉन तिचे यामध्ये सहकलाकार आहेत. चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत असून अत्यंत हॉट अँड सेक्सी लूकमध्ये दिसत आहे. ‘क्वांटिको’ या टीव्ही सिरीजमध्ये काम केल्यानंतर हा चित्रपट तिचे हॉलीवूड पदार्पण ठरणार आहे.                                                                                        सेक्स सिम्बॉल : प्रियांका चोप्राती म्हणते, ‘कोणी तरी मला हॉट किंवा सेक्सी म्हणते म्हणून वाईट वाटण्याची काही गरज नाही. उलट एका मर्यादेपर्यंत ते कौतुकास्पद आहे. पण म्हणून लोकांनी मला केवळ तशाच नजरेने पाहावे अशी माझी इच्छा नाही. सौंदर्य आणि अभिनय या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत.’सध्या हॉलीवूडमध्ये व्यस्त असलेली प्रियांका यंदा कोणता हिंदी चित्रपट स्वीकारते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ‘पद्मावती’नंतर संजय लीला भंन्साळी तिला घेऊन शाहरुखसोबत एक फिल्म बनविणार असल्याची चर्चा होती. मात्र ‘पीसी’ने स्वत:हून या केवळ अफवा असल्याचे सांगितले.नवीन वर्षाचे स्वागत आणि सुटी घालविण्यासाठी ती सध्या भारतात आलेली आहे. हॉलीवूड क्वीन बनल्यानंतरही मनाने पूर्ण देसी असणाऱ्या प्रियांकाने कुटुंबासोबत गोव्यात न्यू इयर साजरा केला. यावेळी ती करणच्या चॅट शोवर जाणार अशी चर्चा आहे.