Join us

काय म्हणता? सुशांत सिंग राजपूतने चंद्रावर खरेदी केली जमीन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 09:37 IST

अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा भविष्यात चंद्रावरचा रहिवासी असेल. होय, सुशांतने चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. ताज्या मुलाखतीत याचा खुलासा झाला.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा भविष्यात चंद्रावरचा रहिवासी असेल. होय, सुशांतने चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. ताज्या मुलाखतीत याचा खुलासा झाला. चंद्रावर Mare Muscoviense वा Sea of Muscovy  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात मी जमिनीचा तुकडा खरेदी केला असल्याचे खुद्द सुशांतनेच या मुलाखतीत सांगितले. यापूर्वी सुशांतने  Meade 14” LX600 नामक टेलिस्कोप खरेदी केल्याची बातमी आली होती. हा टेलिस्कोप सुशांतच्या चंद्रावर असलेल्या या मालमत्तेवर नजर ठेवण्यास मदत करेल. ताज्या मुलाखतीत सुशांतने आपल्या आईच्याही आठवणी जागवल्या. माझे आयुष्य मी स्वत: लिहिन, असे माझी मला नेहमी म्हणायची आणि आज तिचे ते शब्द खरे झाले आहेत, असे तो म्हणाला.

सुशांतने इंटरनॅशनल लुनार लँड रजिस्ट्रीकडून चंद्रावरची  खरेदी केली आहे. याचसोबत चंद्रावर जमीन खरेदी करणारा सुशांत पहिला बॉलिवूड सेलिब्रिटी बनला आहे. तसे तर किंगखान शाहरूख खान याचीही चंद्रावर जमीन आहे. मात्र त्याने ती स्वत: खरेदी केली नसून एका चाहत्याने त्याला ती भेट म्हणून दिली आहे. सुशांतने गत २५ जूनला ही संपत्ती आपल्या नावे केली. मात्र अनेक आंतरराष्ट्रीय करारानुसार, याला कायदेशीर मालकी हक्क मानला जात नाही. कारण पृथ्वीच्या बाहेरच्या जगावर संपूर्ण मानव जातीचा हक्क आहे. कुणी एक व्यक्ति त्यावर कब्जा करू शकत नाही. त्यामुळे खरे काय हे माहित नाही. पण एक मात्र खरे चंद्रावर संपत्ती घेतल्याचे जगाला सांगून सुशांत मोठा धमाका केला आहे. कदाचित हा त्याचा पब्लिसिटी स्टंटही असू शकतो. अहो, सुशांतचा ‘चंदा मामा दूर के’ हा चित्रपट जो येतोय...!

 

 

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत