Join us

सिद्धार्थ मल्होत्राने दीपिका पादुकोणच्या कानात काय बरं सीक्रेट सांगितलं असेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 17:18 IST

सिद्धार्थने दीपिकाच्या कानात एक सीक्रेट सांगताना ते इतरांना सांगू नकोस असे म्हटले, परंतु दीपिकाने काही वेळातच ते जगजाहीर केले. वाचा सविस्तर!

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि मस्तानी दीपिका पादुकोण यांची भेट बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. असे म्हटले जात आहे की, दोघे लवकरच कुठल्यातरी चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. आगामी काळात कदाचित हे दोघे कुठल्यातरी प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करीत असावे. मात्र दोघांच्या या भेटीचे कारण दुसरेच असून, ते आता समोर आले आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपूर्वी दोघांनी एक कमर्शियल अ‍ॅडची शूटिंग केली आहे ज्याची पहिली झलक आता समोर आली आहे. एका ब्रॅण्डसाठी करण्यात आलेल्या या प्रमोशनल शूटमध्ये दोघे काही सीक्रेट लोकांशी शेअर करीत आहेत. व्हिडीओमधील दोघांची बॉण्डिंग खूपच पसंत केली जात आहे.

व्हिडीओमध्ये सिद्धार्थ मस्तानी दीपिकाला विचारतो की, ‘तू एखादे सीक्रेट लपवून ठेवू शकतेस काय? दीपिकाच्या होकारानंतर सिद्धार्थ हळूच तिच्या कानात एक सीक्रेट सांगतो. मग काय, दीपिका हे सीक्रेट काही वेळातच जगजाहीर करते. दीपिका तिने दिलेल्या शब्दावर कायम न राहता सर्व काही खुलेआमपणे लोकांना सांगते. तसेच सिद्धार्थला म्हणते की, हे सीक्रेट तर सगळ्यांनाच माहिती व्हायला हवे.

सध्या दोघांची केमेस्ट्री त्यांच्या चाहत्यांना चांगलीच भावत आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून हे दोघे बºयाच ठिकाणी एकत्र बघावयास मिळत आहेत. गेल्या आठवड्यातच करण जोहरच्या पार्टीत दोघांचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. हा फोटो या दोन्ही स्टार्सनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. गेल्यावर्षी सिद्धार्थने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करताना त्यामध्ये दीपिकासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. असो, जाहिरातीमधील दोघांची केमेस्ट्री पाहता लवकरच हे दोघे एकाद्या चित्रपटात झळकतील, असेच काहीसे चिन्ह दिसत आहे.